नवी दिल्ली : मर्सिडीज कंपनी पुढील महिन्यात दोन नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. या दोन्ही कार अॅडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असतील. दरम्यान, मर्सिडीजच्या आगामी कारच्या लिस्टमध्ये २०२३ मर्सिडीज जीएलई फेसलिफ्ट (2023 Mercedes GLE facelift) आणि मर्सिडीज एएमजी सी ४३ (MERCEDES AMG C 43) यांचा समावेश आहे.
2023 Mercedes GLE SUV Facelift
ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी पुढील महिन्यात २ नोव्हेंबरला २०२३ मर्सिडीज जीएलईचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याच्या तयारीत आहे. तसेच या व्हर्जनच्या किमती २ नोव्हेंबरला जाहीर होतील. मर्सिडीज जीएलईला नुकतेच अपडेट करण्यात आले होते आणि कंपनीने कारला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला आहे. कंपनीने म्हटले आहे की, कारला त्याच स्तरावर मजबूत प्रतिसाद मिळत आहे, जो जर्मन जीएलईसाठी देखील मिळण्याची खात्री आहे.
प्रोडक्शन पिरॅमिडमध्ये जीएलई ही जीएलसीच्या वर आणि टॉप-लाइन जीएलएसच्या खाली बसते. अपडेटेड जीएलई एसयूव्ही फेब्रुवारीमध्ये आणली होती. मुळात ते फेसलिफ्टेड व्हर्जन आहे. नवीनतम व्हर्जनमधील बदलांमध्ये पुढील बाजूस एक नवीन बंपर, एलईडी हेडलाइट्समधील बदल, अपडेटेड टेल लाइट्स आणि अलॉय व्हीलचा नवीन सेट समाविष्ट आहे.
MERCEDES AMG C 43
याचबरोबर, कंपनी २ नोव्हेंबरला मर्सिडीज एएमजी सी ४३ लाँच करण्याच्या तयारीत आहे. परफॉर्मन्स एसयूव्हीला इंटिरियरमध्ये ब्लॅक थीम मिळते आणि दोन्हीमध्ये ब्लॅक नप्पा लेदर अपहोल्स्ट्री आणि पिवळ्या स्टिचिंगसह लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील मिळते. मर्सिडीज पर्यायी ऍक्सेसरी म्हणून एएमजी परफॉर्मन्स बकेट सीट्स देखील देत आहे.
याशिवाय, कारची इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला अपडेटेड यूआय मिळत आहे. तसेच, डिजिटल क्लस्टर, इन्फोटेनमेंट सिस्टम आणि एचयूडी डिस्प्लेमध्ये AMG-specific ग्राफिक्स देण्यात आले आहे. यामध्ये इन्फोटेनमेंट सिस्टमवर एएमजी ट्रॅक पेस सॉफ्टवेअर देखील मिळते, जे तुम्ही ट्रॅकवर घेऊन जाता तेव्हा लॅप टाईम आणि इतर डिटेल्सची गणना करते.