शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
2
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
3
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
4
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
5
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
6
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
7
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
8
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
9
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
10
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
11
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?
12
विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
13
भयंकर! १०० रुपयांवरून दोन कुटुंबात रक्तरंजित संघर्ष; लाठ्या-काठ्यांनी हल्ला, महिलेचा मृत्यू
14
IND vs BAN : आकाश दीपचा 'आत्मविश्वास'; कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'; मग जे घडलं ते लयच भारी!
15
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
16
अरे बापरे! रेल्वेच ट्रॅफिकमध्ये अडकली? कर्नाटकातील व्हिडीओ व्हायरल; रेल्वेने दिले स्पष्टीकरण
17
SL vs NZ : श्रीलंकेची रन मशीन! Kamindu Mendis ला तोड नाय; ८ सामन्यांत ५ शतकं अन् बरंच काही
18
"लादेन समाजामुळे दहशतवादी बनला", जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचे विधान
19
देशात वाढतेय Credit Card डिफॉल्टर्सची संख्या, पाहा Loan घेतल्यानंतर डिफॉल्ट केल्यास काय होतं नुकसान?
20
Pitru Paksha 2024: केवळ श्राद्धविधी केल्याने पितृदोष संपतो का? शास्त्र काय सांगते जाणून घ्या!

MG ची नवीन 7 सीटर कार आज लाँच होणार; अनेक ॲडव्हान्स फीचर्स मिळतील 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 10:36 AM

MG Gloster : ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रमुख बदल नवीन ॲडव्हान्स I-Smart इन्फोटेनमेंट सिस्टम आणि व्हेरिएंटमध्ये बदल असतील.

नवी दिल्ली : एमजी मोटर्स (MG Motors) आपली 7 सीटर एसयूव्ही एमजी ग्लॉस्टर ( SUV MG Gloster) भारतात नवीन अवतारात आणणार आहे. कंपनी आज (31 ऑगस्ट) लाँच करणार आहे. लाँच होण्याआधी, काही स्पाय फोटो समोर आले आहेत, ज्यावरून असा अंदाज लावला जात आहे की, कारच्या एक्सटीरियरमध्ये फार मोठे बदल दिसत नाहीत. मात्र, काही बदल नक्कीच करण्यात आल्याची शक्यता आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, प्रमुख बदल नवीन अॅडव्हान्स I-Smart इन्फोटेनमेंट सिस्टम आणि व्हेरिएंटमध्ये बदल असतील.

नवीन अवतारमध्ये या कारला पूर्वीपेक्षा जास्त ADAS फीचर्स दिले जातील. यात MG Astor प्रमाणे स्तर-2 ADAS फीचर्स असतील, असे म्हटले जात आहे. तसेच, नवीन फीचर्ससह, एमजीची ही एसयूव्ही नुकत्याच आलेल्या Hyundai Tucson शी स्पर्धा करेल. कंपनीने नुकतीच नवीन गाडीची झलक सादर केली आहे. MG Motor ने आपल्या सोशल मीडिया हँडलवर ADAS फीचर्ससह नवीन Gloster ला टीझ केले होते. कंपनीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते की, "4x4 ची पॉवर, ADAS चे प्रोटेक्शन, Advance Gloster रस्त्यावर आणि तुमच्या मनात आपली छाप पाडण्यासाठी येत आहे."

दरम्यान, सध्याच्या MG Gloster सात-सीटरची किंमत 37.28 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते. ADAS फीचर्ससह सुसज्ज असलेली ही एमजीची भारतातील पहिली कार होती. यात ॲडेप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि लेन डिपार्चर वॉर्निंग यांसारख्या अनेक सुविधा आहेत.

याचबरोबर, असे म्हटले जाते की 2.0-लीटर टर्बो डिझेल इंजिन नवीन एमजी ग्लोस्टरमध्ये उपलब्ध राहील. हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. हे 218 PS पॉवर आणि 480 Nm टॉर्क जनरेट करते. यात 7 ड्रायव्हिंग मोड - स्नो, सँड, मड, रॉक, स्पोर्ट, इको आणि ऑटो मिळू शकतात. दमदार सेफ्टी फीचर्सव्यतिरिक्त, या एसयूव्हीमध्ये ड्रायव्हर सीट मसाज फंक्शन, हीडेट ड्रायव्हर यासारख्या सुविधा देखील मिळतात.

टॅग्स :MG Motersएमजी मोटर्सAutomobileवाहन