शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

MG Hector 2023: नवी एमजी हेक्टर आली; सर्वात मोठी स्क्रीन, ट्रॅफिकमध्ये तर नो टेंशन...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 3:50 PM

नेक्स्ट-जनरल हेक्टर 5, 6 आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर केले जात आहे. यामध्ये प्रशस्त जागा, फिचर्स  देण्यात आले आहेत. एमजीने भारतभर ३०० डीलरशीप उघडली आहेत.

एमजी मोटर इंडियाने आज हेक्टर एसयुव्हीची नेक्स्ट जनरेशन सादर केली. काही वर्षांपूर्वी या कंपनीने भारतात पाऊल ठेवत भारतीयांना हायटेक फिचर्स काय असतात ते दाखविले होते. तेव्हा सर्वात मोठ्या स्क्रीन आणि कनेक्टेड वैशिष्ट्यांची ही कार लोकांना खूप आवडली होती. 

नवीन जनरेशन सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग अधिक सोईचे करण्यात आले आहे. नेक्स्ट-जनरल हेक्टर 5, 6 आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर केले जात आहे. यामध्ये प्रशस्त जागा, फिचर्स  देण्यात आले आहेत. एमजीने भारतभर ३०० डीलरशीप उघडली आहेत.

नवीन SUV ला संपूर्ण नवीन यूजर इंटरफेससह भारतातील सर्वात मोठी 35.56 सेमी (14-इंच) HD पोर्ट्रेट इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. सेगमेंट-फर्स्ट डिजिटल ब्लूटूथ की आणि की-शेअरिंग क्षमतेमध्ये नवे शोध दिसतात. आपत्कालीन परिस्थितीत किंवा किल्ली हरवल्यास वाहन उघडणे, बंद करणे, सुरू करणे आणि चालवणे यासाठी डिजिटल की वापरली जाऊ शकते. रिमोट लॉक/अनलॉक वैशिष्ट्य वापरून कार कुठूनही अनलॉक केली जाऊ शकते.

अडास तर आहेच, पण इंटेलिजेंट ट्रॅफिक जॅम असिस्ट (TJA) लेनच्या मध्यभागी वाहन ठेवून आणि येणाऱ्या वाहनांपासून सुरक्षित अंतर राखून ट्रॅफिक जॅम परिस्थितीत अधिक सुरक्षा देते. हेक्टरमध्ये आता 75 हून अधिक कनेक्टेड फीचर्स उपलब्ध आहेत. यामध्ये 100 व्हॉइस कमांडचा समावेश आहे. 

सनरूफ साठी टच-स्क्रीन कंट्रोल, एंबियंट लाइट साठी व्हॉईस कमांड्स, 5 भारतीय भाषांमध्ये नेविगेशन वॉयस गाइडन्स, 50+ हिंग्लिश कमांड्स व अनेक अशी अॅप्स वापरता येणार आहेत. इन्फिनिटीची प्रिमियम ऑडिओ सिस्टीम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह सक्षम आहे. ज्यामुळे एक इमर्सिव्ह सराउंड साउंड अनुभव मिळतो. नेक्स्ट-जेन हेक्टरमध्ये 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री एचडी कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS), हिल असिस्ट कंट्रोल (HAC), सर्व चार-चाकी डिस्क ब्रेक, सर्व सीटसाठी 3-पॉइंट सीट आहेत.

 

टॅग्स :MG Motersएमजी मोटर्स