नवी दिल्ली : भारतातील सर्वाधिक पसंतीच्या आणि खपाच्या Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी जगविख्यात कंपनीची धांसू एसयुव्ही लवकरच येत आहे. MG Motor India याची तयारी करत असून क्रेटाला तगडा प्रतिस्पर्धी मिळणार आहे. (petrol-powered version of the MG ZS EV, likely to be called the Astor, should be launched in India by Diwali.)
थोडा इंतजार! काही महिने होत नाही तोच, Hyundai Creta येतेय नव्या अवतारात; पहा एकच झलक...एमजी मोटर्स या नव्या एसयुव्हीचे नाव एमजी एस्टर (MG Astor) ठेवण्याची शक्यता आहे. ही एसयुव्ही भारतात लाँच झालेल्या MG ZS EV चे पेट्रोल व्हर्जन आहे. ही कार तिसऱ्या तिमाहीत लाँच करण्यात येणार आहे. एमजी एस्टर Hyundai Creta, Kia Seltos, Skoda Kushaq या गाड्यांना टक्कर देणार आहे. या कारचे डिझाईन हुबेहुब MG ZS EV सारखेच आहे. मात्र, यामध्ये 3D स्पोक्ड ग्रिल ऐवजी हेक्सागोनल शेपमध्ये ग्रिल्स दिले जाणार आहेत. एमजीची ही नवी कार भारतात लाँच केलेल्या इलेक्ट्रीक कारचे पेट्रोल व्हर्जन असणार आहे. एमजीची ही इलेक्ट्रीक कार 419 km ची रेंज देते.
दमदार फीचर्ससह भारतात लाँच झाली Hyundai Alcazar SUV; पाहा किती आहे किंमतप्रदीर्घ प्रतीक्षेनंतर Hyundai Alcazar ही सात सीटर एसयूव्ही अखेर भारतात लाँच झाली आहे. Prestige, Platinum आणि Signature या तीन ट्रिम्समध्ये ही कार बाजारात उपलब्ध असणार आहे. तसंच यासोबत कंपनीनं ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंटचेदेखील ऑप्शन दिले आहेत. कंपनीनं या महिन्याच्या सुरूवातीलाच कारचं बुकिंग घेण्यास सुरू केलं होतं. तसंच ग्राहकांना २५ हजार रूपयांत ही कार बुक करण्याची संधीही होती. या कारची स्पर्धा Hector Plus, XUV500 आणि Tata Safari सारख्या कार्ससोबत आहे.
ह्युंदाई क्रोटा खरेदी करायची असेल तर थोडा वेळ वाट पाहिली तर फायद्याचे ठरणार आहे. कंपनी भारतीय बाजारात नवीन क्रेटा (2022 Hyundai Creta Facelift) लाँच करण्याची तयारी करत आहे. हे कारचे मिड लाईफ अपडेट असणार आहे.