MG Motors भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात विस्तार करण्याची योजना आखत आहे. कंपनी यावर्षी नवीन ऑफर करू शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी परवडणारी ईव्ही मॉडेल लॉन्च करण्याचा विचार करत आहे. CarToq च्या अहवालानुसार, ब्रिटीश ब्रँड एमजी मोटर्स जो चीनी ऑटोमोबाईल निर्माता SAIC मोटरची उपकंपनी आहे या मॉडेलद्वारे भारतातील शहरी लोकसंख्येला विचारात घेऊन कार निर्मिती केली जाणार आहे. ही कमी किमतीची इलेक्ट्रिक कार असेल.
कंपनीनं नुकतीच इलेक्ट्रिक कार MG ZS EV चा नवा मॉडल भारतात लाँच केला. पण आगामी काळात EV ची किंमत आणखी कमी होईल, अशी शक्यता आहे. एमजी मोटर्स आता एक नवीन EV लाँच करण्याची योजना करत आहे जी खास भारतीय खरेदीदारांसाठी डिझाइन केलेली आहे. MG Motors स्पष्टपणे भारतीय ऑटोमोबाईल बाजारातील EV विभागावर लक्ष केंद्रित करत आहे. हा उद्योग किमतीच्या बाबतीत संवेदनशील असल्याचे कंपनीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे, कंपनी येत्या काळात बजेट ईव्ही मॉडेल सादर करण्याचा विचार करत आहे यात आश्चर्य वाटणार नाही. भारतीय बाजारपेठे व्यतिरिक्त, MG Motors हे इतर जवळपासच्या बाजारपेठांमध्ये देखील आणू शकते.
नवीन EV Hongguang Mini EV वर आधारितEV ही कॉम्पॅक्ट टू डोअर आणि टाइट टर्निंग सर्कल असलेली कार आहे, जी शहरी वातावरणासाठी उत्तम आहे. परवडणारी EV SAIC-GM-Wuling ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, ज्यामध्ये Baojun E100, E200, E300, आणि E300 Plus तसेच Wuling Hongguang Mini EV यांचा समावेश आहे.
MG आगामी EV Hongguang Mini EV वर आधारित असू शकते. जे भारतानुसार कस्टमाइझ केले जाईल. काही बदलांमध्ये लांब व्हीलबेस आणि फाइव्ह डोअर डिझाइनचा समावेश असू शकतो.