गेल्या काही आठवड्यांपासून टीझर फोटो जारी केल्यानंतर MG Motorची नवी कोरी एसयुव्ही MG One अधिकृतरित्या समोर आली आहे. ही कार नवीन आर्किटेक्टर आणि डिझाईन लँग्वेजच्या सुरुवातीचे प्रतिक आहे. कंपनीने हा दावा केला आहे की, नवीन एसयुव्हीमध्ये अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. MG One SUV चा ग्लोबर प्रिमियर 30 जुलै, 2021 ला झाला. (MG Motor has finally taken the wraps off its latest SUV, the MG One)
भन्नाट ऑफर! ‘ही’ Honda कार १८ ऑगस्ट होतेय लॉंच; बुकिंग प्राइज केवळ ५ हजार रुपये
एमजी मोटरची ही नवी एसयुव्ही दोन रंगात उपलब्ध होणार आहे. यामध्ये बबल ऑरेंज आणि वाईल्डरनेस ग्रीन रंग आहे. MG One एसयुव्ही टेपरिंग रुफलाईन आहे, जी मागच्या बाजुकडे झुकते. यामध्ये ड्युअल टोन कलर स्कीम मिळते. जे एक्सटीरिअर प्रोफाईलला हायलाईट करते. एमजी वन एसयुव्हीमध्ये 18 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. यासोबतच एमजी आपल्या नव्या एसयुव्हीसोबत कस्टमायझेशन देखील ऑफर करू शकते.
Tata Tiago NRG रिटर्न; स्पोर्टी लूक अन् लाँचिंग ऑफर, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स...
एमजीने नव्या सिग्मा आर्किटेक्चरवर ही कार बनविली आहे. एमजी वनला एका अॅक्टिव्ह डिजिटल इको सिस्टिमसोबत पावरफूल चिप टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. सिग्मा प्लॅटफॉर्मचा वापर इलेक्ट्रिक पावरट्रेनसाठी देखील केला जाऊ शकतो. एमजी वन एक कनेक्टेड कार असेल. फोटोंवरून या कारचे स्पोर्टी डिझाईन आणि स्टान्सबाबत कल्पना येते.
EV घेणाऱ्यांसाठी गडकरींच्या मंत्रालयाकडून मोठी खूशखबर; केंद्राने दिली सूट, आणखी पैसे वाचणार
MG SUV ही थोडी कमी उंचीची करण्यात आली आहे, यामागे आत जास्त जागा मिळावी हा उद्देश आहे. सिग्मा आर्किटेक्चर आतील जागेची उपलब्धता 75 टक्क्यांपर्यंत वाढविते, असा कंपनीचा दावा आहे.