मुंबई : ब्रिटीश कंपनी मॉरिस गॅरेज म्हणजेच एमजीने सहा महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवले होते. भारतातील पहिली इंटरनेट कार लाँच केल्याने वाहन क्षेत्रात खळबळ उडाली होती. मंदीचा काळ असतानाही एमजीच्या हेक्टर एसयुव्हीला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आज कंपनीने इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे.
एमजीने भारतातील पहिली इलेक्ट्रीक इंटरनेट एसयुव्ही डिसेंबरमध्ये दाखविली होती. MG ZS EV असे या कारचे नाव असून जानेवारीमध्ये या कारच्या किंमती जाहीर केल्या जाणार होत्या. ही कार ह्युंदाईच्या कोनाला टक्कर देणार आहे. महत्वाचे म्हणजे या कारची एकदा चार्ज केल्याची रेंज 340 किमी असणार आहे. एमजीने या इलेक्ट्रीक कारचे बुकिंग सुरू केले असून 50 हजार रुपयांत ही कार बूक करता येणार आहे. ही एसयुव्ही 27 जानेवारीला भारतीय बाजारात लाँच केली जाणार आहे. एमजी मोटरची ही कार भारतातील दुसरी कार असणार आहे.
MG ZS EV मध्ये इलेक्ट्रीक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 141 बीएचपी ताकद प्रदान करते. तसेच 353 एनएम टॉर्क तयार करते. याला 44.5 kWh बॅटरी ताकद देते.
गाढवाने MG Hector ला ओढले, त्रस्त मालकाने फोटो काढले; पाहून कंपनीचा पाराच चढलाMG Hector SUV Review : हेक्टरवर तरुणाई एवढी का भाळली? 40 लाखांच्या एसयुव्हीची फिचर्स 15 लाखांत? वाचा
MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी 50 kW DC चार्जर देण्यात आला आहे. यामुळे ही कार 40 मिनिटांतच 80 टक्के चार्ज होते. तर 7.4 kW च्या चार्जरने बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास 7 तास लागतात. ही इलेक्ट्रीक कार 8 सेकंदांमध्ये 0 ते 100 किमी प्रतीतास वेगाने धावते. यामध्ये वापरण्यात आलेली बॅटरी IP67 सर्टिफाइड आहे. यावर पाणी आणि धुळीचा परिणाम होत नाही.