देशात सध्या 20 हून अधिक सीएनजी कार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पण, भारतीय बाजारात अजूनही 7 सीटर सीएनजी कार्सची कमतरता आहे. तुम्ही 7 सीटर सीएनजी कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, कारण आज आम्ही 6/7 सीटर सीएनजी कार सेगमेंटमधील दोन सर्वोत्तम पर्यायांबद्दल सांगणार आहोत, अर्टिगा सीएनजी आणि एक्सएल6 सीएनजी कार, तर चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
Maruti Suzuki Ertigaमारुती सुझुकी एर्टिगा ही बाजारात 15 लाख रुपयांखालील सर्वात आरामदायक आणि प्रॅक्टिकल MPV आहे. Ertiga CNG मध्ये 1.5L ड्युअलजेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे CNG मोडमध्ये 87bhp पीक पॉवर आणि 121.5Nm टॉर्क आउटपुट जनरेट करण्यास सक्षम आहे.
दुसरीकडे, या कारच्या मायलेजच्या बाबतीत, ही MPV CNG सह 26.11 किमी/किलो मायलेज देण्यास सक्षम आहे. भारतातील मारुती एर्टिगा CNG ची किंमत बेस VXi व्हेरिअंटची किंमत 10.44 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते, तर ZXi CNG व्हेरिअंटची किंमत 11.54 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.
Maruti XL 6 CNGमारुती XL6 ही भारतीय बाजारपेठेतील अर्टिगाची प्रीमिअम व्हेरिअंट कार आहे. ही कार ६ सीटर असून अतिशय आरामदायक आहे. यामध्ये फीचर्सची मोठी लिस्टच मिळत नाही, तर यात अनेक अपडेट्सही देण्यात आलेत.
नुकतीच लाँच झालेली XL6 CNG हा प्रत्येकासाठी चांगला पर्याय आहे. XL6 CNG मध्ये असलेले इंजिन Ertiga CNG प्रमाणेच आहे. हे फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. या कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, ही कार CNG मध्ये 26.32 किमी/किलोचे मायलेज देते. ही कार केवळ फक्त एंट्री-लेव्हल Zeta व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असून मारुती XL6 CNG ची किंमत रु. 12.24 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.