नवी दिल्ली : MINI ने ऑल-इलेक्ट्रिक कूपर SE चे नवीन स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केले आहे. या कारला चार्ज्ड एडिशन असे नाव देण्यात आले आहे. या ऑल-इलेक्ट्रिक स्पोर्टी हॅचबॅकची किंमत 55 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. सीबीयू रुटअंतर्गत पूर्णपणे आयात केलेले मॉडेल म्हणून सादर केले गेले आहे, या विशेष एडिशन मॉडेलचे फक्त 20 युनिट्स भारतीय बाजारपेठेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दरम्यान, चार्ज्ड एडिशन ही भारतात MINI द्वारे ऑफर केलेली पहिली लिमिटेड व्हर्जन 3-डोर कूपर SEआहे. ही कार केवळ MINI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे (भारतासाठी) बुकिंगसाठी उपलब्ध आहे. मिनी चार्ज्ड एडिशन ड्युअल-टोन पेंट स्कीमसह उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुफवर चिली रेड शेड आणि अस्पेन व्हाइट कलर देण्यात आला आहे.
हेडलाइट आणि टेल लाइट रिंग्स, डोअर हँडल, लोगो आणि टेलगेट हँडलभोवती अधिक पांढरे एक्सेंट जोडले गेले आहेत. चार्ज्ड एडिशनला केबिनमध्ये ऑल-ब्लॅक थीम मिळते. तसेच, स्पोर्ट्स सीटसह लेदरेट कार्बन ब्लॅक अपहोल्स्ट्री मिळते. कारमध्ये नाप्पा लेदर रॅप्ड मल्टीफंक्शन स्टीयरिंग व्हील देखील देण्यात आले आहेत. यामध्ये स्टार्ट/स्टॉप टॉगल स्विच आणि गियर लीव्हरभोवती आकर्षक पिवळे एक्सेंट देण्यात आले आहे.
कारमध्ये 5-इंचाचा संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, 8.8-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट डिस्प्ले, अॅम्बियंट लाइटिंग, नेव्हिगेशनसह मिनी वायर्ड पॅकेज, वायरलेस चार्जिंग, ऑटो स्टार्ट/स्टॉप फंक्शन, क्रूझ कंट्रोल, ऍपल कारप्ले आणि हार्मन कार्डन हाय-फाय स्पीकर सिस्टम असे फीचर्स देण्यात आले आहेत. याचबरोबर, ही कार त्याच इलेक्ट्रिक मोटरसह येते, जे 182 Bhp आणि 270 Nm जनरेट करते. यामध्ये 32.6kWh बॅटरी पॅक मिळतो, जो सिंगल चार्जवर 270 किमीची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करतो. यात स्पोर्ट आणि ग्रीन असे दोन ड्राइव्ह मोड आहेत.