आपल्या लग्झरी मोटारसायकलसाठी ओळखल्या जाणाऱ्या Triumph कंपनीने भारतीय बाजारात Scrambler 900 आणि Speed Twin 900 लॉन्च केल्या आहेत. कंपनीने यात दमदार इंजिनसह अनेक फीचर्स दिले आहेत. ट्रायम्फने या दोन्ही गाड्यांमध्ये 900cc चे पॉवरफुल इंजिन दिले आहे. Triumph ट्विन आणि स्क्रॅम्बलर असे या दोन्ही गाड्यांची नावे आहेत.
3 रगांमध्ये उपलब्धSpeed Twin 900 तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल - जेट ब्लॅक, मॅट आयर्नस्टोन आणि मॅट सिल्व्हर आइस. तर, Scrambler 900 देखील 3 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल - जेट ब्लॅक, मेट खाकी आणि कार्निव्हल रेड/ब्लॅक. या रीबॅज केलेल्या मॉडेल्सना नवीन पेंट स्कीम आणि साइड पॅनल्सवर नवीन बॅजिंग मिळेल.
इतकी आहे किंमत...स्क्रॅम्बलर 900 जेट ब्लॅकची किंमत 9.45 लाख रुपये, मॅट खाकी 9.58 लाख रुपये, कार्निव्हल रेड/जेट ब्लॅक 9.75 लाख रुपये आहे. कार्निव्हल रेड/जेट ब्लॅक रंग पहिल्यांदाच देण्यात आला आहे. हे नवीन मॉडेल मूळ जेट ब्लॅकपेक्षा 30,000 रुपये महाग असेल. दुसरीकडे, स्पीड ट्विन 900 जेट ब्लॅकची किंमत 8.35 लाख रुपये, मॅट आयरनस्टोनची किंमत 8.48 लाख रुपये आणि मॅट सिल्व्हर आइसची किंमत 8.48 लाख रुपये आहे.
बाईकमध्ये दमदार इंजिनट्रायम्फच्या दोन्ही बाइक्समध्ये 900cc, पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 64hp पॉवर आणि 80Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकच्या रेंजबाबत बोलायचे झाले, तर Scrambler 900 ऑफ-रोडवर अधिक रेव्ह रेंज देते. दोन्ही मोटारसायकल स्लिपर क्लचसह 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेल्या आहेत. तसेच, या बाइक्समध्ये 12-लीटरची इंधन टाकीदेखील मिळते.
दोन्ही बाईकमधील फरकया दोन्ही बाईकच्या टायरच्या आकारात आणि स्टाइलमध्ये बरेच बदल आहेत. स्पीड ट्विन 900 ला कास्ट-अॅलॉय सेट-अप, समोर 100/90-18 चाके आणि मागील बाजूस 150/70-R17 आहे. Scrambler 900 ला एक स्पोक रिम आहे, ज्याच्या समोर 100/90-19 आणि मागील बाजूस 150/70-R17 चाके आहेत. स्पीड ट्विन 900 चे वजन 216 kg आणि Scrambler 900 चे वजन 223 kg आहे.
सुरक्षा फीचर्सरायडरच्या सुरक्षेसाठी ट्रायम्फने स्पीड ट्विन 900 आणि स्क्रॅम्बलर 900 मॉडेल्समध्ये ब्रेकिंग सिस्टीम सारखीच ठेवली आहे. यामध्ये, तुम्हाला सिंगल 310mm फोर-पिस्टन ब्रेम्बो कॅलिपरसह समोरील बाजूस डिस्क ब्रेक मिळेल. तर, मागील बाजूस 255mm टू-पिस्टन निसिन कॅलिपर डिस्क ब्रेक दिले आहे.