भारतीय कार ग्राहक 2023 मध्ये ज्या कारची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, त्यांपैकी एक म्हणजे, मारुती सुझुकी जिम्नी. सध्या परदेशातील बाजारात 3-डोअर मारुती जिम्नी विकली जाते. तर भारतात एसयूव्हीचे 5-डोअर व्हर्जन सादर होण्याच्या तयारीत आहे. मात्र, फार कमी लोकांना माहीत आहे, की जपानमध्ये 5-डोअर जिम्नी फार पूर्वीच सादर करण्यात आली होती. जपानच्या Nihon Automotive College (NATS) च्या विद्यार्थ्यांनी एक मॉडिफाय 5-डोअर Jimny दाखवली आहे.
ही जिम्नी एवढी आकर्षक दिसत आहे, की आपलीही हिला ऑफ-रोडिंगवर घेऊन जाण्यची इच्छा होईल. या मॉडिफाइड Jimny चे फोटोज nats_castomize_arita ने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय, एका व्हिडिओमध्ये आपण या Jimny ला खराब रस्त्यांवरही सहजपणे चालताना पाहू शकता.
मॉडिफिकेशनसंदर्भात बोलायचे झाल्यास, या गाडीला MT टायरसह एक लिफ्ट किट देण्यात आली आहे. याशिवाय हिची बॉडीही थोडी उंच करण्यात आली आहे. हिला रूफ माउंटेड टेंट, ऑक्झिलरी लायटिंग, स्पेअर व्हील माउंट देखील देण्यात आले आहे. दोन्ही बाजूंना कस्टम-मेड बंपर वापरण्यात आले आहेत. याशिवाय हिला कंपनीचेच 1.5L NA पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. याच बरोबर, हिच्यात वजन आणि चंकी टायरबरोबरच चांगल्या ड्रायव्हिंग क्षमतेसाठी काही बदलही करण्यात आले आहेत.
ऑटो एक्सपोमध्ये लॉन्चिंग -भारतात मारुती सुझुकी जिम्नी 5-डोअर ऑटो एक्सपो 2023 दरम्यान सादर करण्यात येईल. हीची स्पर्धा महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा सारख्या एसयूव्हींसोबत असेल. ही कार कस्टम मेड जिम्नी सारखीच दिसू शकते. मात्र, हिला एवढ्या अॅक्सेसरीज लागलेल्या नसतील. 1.5L इंजिन या 5-डोअर जिम्नीला पॉवर देण्याचे काम करेल. हे इंजिन ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल अशा दोन्ही गिअरबॉक्ससह येते. आशा आहे की, जिम्नी 5-डोअरची किंमत 10 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होईल.