शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

आधीपेक्षा जास्त ताकदवान, स्पोर्टी Toyota Fortuner लाँच; Fortuner Legender तर SUVचा 'बाप'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 2:15 AM

2021 टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टचा लूक आणि डिझाईन खूप चांगला आहे. नवीन हेडलँप, नवीन एलईडी टेललँप, १८ इंचाचे नवीन अलॉय व्हील्स, मोठी फ्रंट ग्रील आणि नवीन डिझाईनचा रिअर बंपर देण्यात आला आहे.

नवी दिल्ली : Toyota India ने आपली पावरफुल फुलसाईज एसयुव्ही Toyota Fortuner चा नवा अवतार भारतात लाँच झाला आहे. नवीन 2021 Toyota Fortuner Facelift आधीपेक्षा जास्त ताकदवान, स्पोर्टी झाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 29.98 लाख रुपये आहे. 

याचबरोबर टोयोटाने फॉर्च्यूनरचा आणखी एक व्हेरिअंट Toyota Legender लाँच केला. या एसयुव्हीची किंमत 37.58 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टमध्ये 2.8 लीटरचे टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 204bhp ची ताकद आणि 500Nm चा टॉर्क प्रदान करते. या आधीच्या एसयुव्हीचे इंजिन 177 bhp ची ताकद आणि 450 Nm टॉर्क प्रदान करत होते. नवीन फॉर्च्यूनरला जास्त ताकद प्रदान करण्यात आली आहे. 2021 Toyota Fortuner Facelift ला 2.7 लीटर पेट्रोल इंजिनसोबतही लाँच करण्यात आले आहे. जे 166bhp ताकद देते. ही एसयुव्ही मॅन्युअल आणि  ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रांसमिशनमध्ये उपलब्ध आहे. आजपर्यंत १.७ लाख फॉर्च्यूनर विकल्या गेल्या आहेत. 

2021 टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टचा लूक आणि डिझाईन खूप चांगला आहे. नवीन हेडलँप, नवीन एलईडी टेललँप, १८ इंचाचे नवीन अलॉय व्हील्स, मोठी फ्रंट ग्रील आणि नवीन डिझाईनचा रिअर बंपर देण्यात आला आहे. या एसयुव्हीमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आल्याने ते आरामात दिसून येतात. टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टमध्ये 8.0 इंचाची का टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. जी स्मार्ट कनेक्टेड फीचरसोबत अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड सपोर्टसोबत येते. यामध्ये सीट व्हेंटिलेशन सिस्टिम, ११ स्पिकर प्रिमिअम जेबीएल देखील देण्यात आली आहे. याचबरोबर नव्या फॉर्च्यूनरमध्ये Eco, Normal आणि स्पोर्ट मोडही देण्यात आले आहेत. 

Fortuner Legenderभारतीय ग्राहकांची पसंत पाहून टोयोटाने आणखी स्पोर्टी आणि स्टायलीश व प्रिमिअम वाटणारी Fortuner Legender लाँच केली आहे. यामध्ये कम्फर्टकडे विशेष लक्ष देण्यात आहे. वायरलेस चार्जिंगसह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Toyotaटोयोटा