मारुतीच्या ऑफरोड एसयूव्ही जिम्नीला पहिल्या दोन दिवसांत प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या कालावधीत या कारला 3 हजार बुकिंग मिळाले आहेत. मात्र, ही संख्या मारुतीच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे. कंपनीने 12 जानेवारी रोजी ऑटो एक्सपो 2023 मध्ये ही कार लाँच केली होती, त्यानंतरच त्याचे बुकिंग सुरू झाले होते. केवळ 11,000 रुपये भरून ऑनलाइन किंवा ऑफलाइन ही कार बुक करता येईल. एक्सप्रेस ड्राईव्हच्या रिपोर्टनुसार, जिम्नीला लाँचिंगच्या पहिल्या दोन दिवसांतच 3000 बुकिंग मिळाले आहेत.
हे जिम्नीचे 5 डोअर मॉडेल आहे. कंपनीने अद्याप या कारची किंमत जाहीर केलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार, या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10 ते 12 लाख रुपये असू शकते. विशेष बाब म्हणजे यामध्ये कंपनीने 4X4 टेक्नॉलॉजी वापरली आहे. तुम्हाला ही कार सात कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेत या कारची थेट स्पर्धा महिंद्रा थारच्या 2WD आणि 4WD शी होईल.
काय आहेत फीचर्स?मारुती सुझुकीने जिमनी 5 डोअरमध्ये 4 सिलिंडरसह 1.5 लीटर K-15-B पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 101 bhp पॉवर आणि 130 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत कंपनीने 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय दिला आहे. यासोबतच, मारुती सुझुकीने या ऑफ रोड एसयूव्हीमध्ये 4X4 व्हील ड्राइव्हचे फीचरही दिले आहे.
याशिवाय या कारमध्ये तुम्हाला फ्लॅट रिक्लाईन सीट्स पाहायला मिळती. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने 6 एअरबॅग्स, हिल होल्ड असिस्टसोबत ईएसपी, हिल डिसेंट कंट्रोल, रिअर व्ह्यू कॅमेरा यांसारखे फीचर्स पाहायला मिळतील. याशिवाय यात ईबीडी आणि एबीएससारखे फीचर्सही देण्यात आलेत. तुम्हाला ही कार www.nexaexperience.com/jimny या वेबसाईटवरून बुक करता येईल.