परदेशात राहणार्या भारतीयांना लक्झरी कारची खूप आवड असते. तुम्ही अशा अनेक भारतीयांबद्दल वाचले किंवा ऐकले असेल, जे परदेशात राहतात आणि त्यांच्याकडे महागड्या कार आहेत. शेकडो भारतीय आहेत ज्यांच्याकडे रोल्स रॉयस आणि रेंज रोव्हरसह जगभरातील कार कंपन्यांच्या लाखो कार आहेत. असाच एका एनआरआयकडे आलिशान बुगाटी कार आहे, या कारची किंमत अंदाजे 21 कोटी रुपये आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या मयूर श्री नावाच्या भारतीयाकडे बुगाटी चिरॉन (Bugatti Chiron) आहे. मयूर श्री हे बुगाटी चिरॉनचे मालक असलेले जगातील एकमेव भारतीय आहेत. त्यांच्याशिवाय संपूर्ण जगात बुगाटी चिरॉनचा मालक असलेला दुसरा भारतीय नाही. मयूर श्री यांनी काही वर्षांपूर्वी चिरॉन खरेदी केली होती. चिरॉनसाठी त्यांनी नेमकी किती किंमत मोजली, हे माहित नाही. परंतु कारसाठी जवळपास 21 कोटी रुपये दिले असावेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मयूर श्री हे रिअल इस्टेट व्यावसायिक आहेत. ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथील टेक्सासमध्ये कार्यरत आहे. मयूर यांच्या गॅरेजमध्ये असलेली बुगाटी चिरॉन ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. बुगाटी चिरॉनमध्ये 8.0-लीटर, क्वाड-टर्बोचार्ज्ड W16 इंजिन आहे, जे 1,479 बीएचपी आणि 1,600 एनएम पीक टॉर्क निर्माण करते. कारच्या चारही चाकांना पॉवर सप्लाय देण्यासाठी त्यात हालडॅक्स ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टिम देण्यात आली आहे.
जगात बुगाटी चिरॉनचे फक्त 100 युनिट्स आहेत. ही कार रस्त्यावर फार दुर्मिळ दिसते. ही जगातील सर्वात वेगवान कार आहे. तो इतका वेगवान आहे की, कारचा सर्वोच्च वेग सामान्य रस्त्यावरही गाठता येणार नाही. बुगाटी चिरॉनचा सर्वोच्च वेग 420 किमी प्रतितास आहे. ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त 2.5 सेकंद घेते. या सुपरकारचा लूक आणि फीचर्स असे आहेत की, ती पाहून कोणीही आवडेल.