जगातील सर्वात पॉवरफुल लक्झरी SUV Aston Martin DBX 707 भारतात लाँच करण्यात आली आहे. कंपनीकडून भारतात आधीच विकल्या जाणाऱ्या Aston Martin DBX चे हे अधिक पॉवरफुल व्हर्जन आहे. ही कार इतकी पॉवरफुल आहे की, ती केवळ 3.3 सेकंदात 0 ते 100 च्या वेगाने धावते. याशिवाय, कारचे इंजिन 707 bhp ची अविश्वसनीय पॉवर देखील जनरेट करते. ही Lamborghini Urus पेक्षा वेगवान आहे आणि आता तुम्ही खरेदी करू शकणारी सर्वात आलिशान सुपर एसयूव्ही आहे. जागतिक बाजारपेठेत या कारची स्पर्धा entley Bentayga, Ferrari Purosangue आणि Lamborghini Urus यांच्यासोबत होणार आहे.
भारतात कारची किंमत 4.63 कोटी रुपये (एक्स-शोरूम, भारत) निश्चित करण्यात आली आहे. Aston Martin DBX 707 मध्ये 4.0-लिटर V8 इंजिन आहे. हे 707 Bhp आणि 900 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिन 9-स्पीड वेट क्लच गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ही कार 3.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेगाने धावते, जी Ferrari Purosangue च्या बरोबरीने आणि Lamborghini Urus पेक्षा 0.3 सेकंद वेगवान आहे. कारचा टॉप स्पीड देखील 311 किमी प्रतितास आहे.
डिझाईनच्या बाबतीत Aston Martin DBX 707 ला एक मोठा फ्रंट ग्रील आणि नवीन एअर इनटेक आणि पूर्णपणे पुन्हा डिझाइन केलेले डीआरएल देण्यात आले आहे. Aston Martin DBX 707 ला सॉफ्ट-क्लोज डोअर देखील मिळतात. मागील बाजूस रूफ विंगसाठी नवीन लिप स्पॉयलर आहे, तर नवीन एक्झॉस्टच्या डिफ्यूझरमध्ये ग्लॉस ब्लॅक ट्रीटमेंट जोडण्यात आली आहे. स्विचगियरसाठी आतील भागात डार्क क्रोम फिनिश आहे. याशिवाय, स्पोर्ट सीट्स, समोर आणि मागील बाजूस 16-वे इलेक्ट्रिक ऍडजस्टमेंटसह हीटिंग फंक्शन देखील उपलब्ध आहे.