भारतीय ग्राहकांमध्ये टू-व्हीलर्स म्हणजेच दुचाकी वाहने खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे ऑटो मार्केटमध्ये दुचाकी वाहनांच्या विक्रीत मोठ्यात प्रमाणात वाढ होताना दिसून येते. दरम्यान, भारतात दुचाकींच्या विक्रीबाबत बोलायचे झाले तर हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) आघाडीवर असल्याचे दिसून येते. पुन्हा एकदा हिरो स्प्लेंडरने अव्वल स्थान पटकावले आहे. जर सप्टेंबर 2024 च्या विक्रीचे आकडे पाहिले तर हिरो स्प्लेंडरचे नाव सर्वात वरच्या यादीत आहे.
हिरो स्प्लेंडर लिस्टमध्ये टॉपहिरो स्प्लेंडरने (Hero Splendor) सप्टेंबर महिन्यात एकूण 3 लाख 75 हजार 886 मोटारसायकलींची विक्री केली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याशी तुलना केल्यास ही संख्या 3 लाख 19 हजार 693 होती. हिरो स्प्लेंडरची विक्री वार्षिक आधारावर 17.58 टक्क्यांनी वाढली आहे.
होंडा शाईन दुसऱ्या स्थानावरविक्रीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाबाबत बोलायचे झाले तर ती होंडा शाईन (Honda Shine) आहे. होंडा शाईनने 12.56 टक्के वार्षिक वाढीसह 1 लाख 81 हजार 835 बाईक्सची विक्री केली. विक्रीच्या बाबतीत बजाज पल्सर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 15.86 टक्के वार्षिक वाढीसह बजाज पल्सरने 1 लाख 39 हजार 182 बाईक्सची विक्री केली.
चौथ्या आणि पाचव्या स्थानावर 'या' बाईक्सविक्रीच्या बाबतीत हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe) चौथ्या स्थानावर आहे. सप्टेंबर महिन्यात हिरो एचएफ डिलक्सच्या एकूण 1 लाख 13 हजार 827 युनिट्सची विक्री झाली, जी वार्षिक 35.32 टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय, बजाज प्लॅटिना विक्री यादीत पाचव्या स्थानावर आहे, ज्याने 2.38 टक्के वार्षिक वाढीसह एकूण 49 हजार 774 युनिट्सची विक्री केली.
या बाईक्सचाही समावेशदुचाकींच्या विक्रीच्या बाबतीत टीव्हीएस रायडर (TVS Rider) सहाव्या स्थानावर आहे, तर टीव्हीएस अपाचे (TVS Apache) सातव्या स्थानावर आहे. टीव्हीएस अपाचे 55.52 टक्के वार्षिक वाढीसह एकूण 41 हजार 640 बाईक्स विकल्या. याशिवाय, आठव्या क्रमांकावर Hero Extreme 125 आहे, ज्यांच्या बाईकची सप्टेंबर महिन्यात 37 हजार 520 युनिट्सची विक्री झाली.