सध्या देशात इलेक्ट्रिक कार सोबतच इलेक्ट्रिक दुचाकींची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. बाजारात विविध कंपन्यांच्या दुचाकी येत आहेत. मंगळवारी इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँड Motovolt ने आपली नवी ई-बाइक लॉन्च केल. या बाइकला URBN e-bike असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ही ई-बाइक केवळ 999 रुपयांत बुक करता येऊ शकते. ही ई-बाइक फुल चार्ज झाल्यानंतर तब्बल 120KMची रेंज देते. तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन ही बाइक तयार केली असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
काय आहे या URBN e-bike मध्ये खास -कंपनीने या बाइकची किंमत केवळ 49,999 रुपये एवढी ठेवली आहे. ही बाइक मोटोव्होल्ट कंपनीच्या वेबसाइटवर आणि 100+ फिजिकल रिटेल पॉइंट्सवर 999/- रुपयांत बुक केली जाऊ शकते. ही बाइक आपण ईएमआयवरही खरेदी करू शकता. महत्वाचे म्हणजे ही बाइक चालविण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या लायसन्सची अथवा रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही.
Motovolt URBN मध्ये एक रिमूव्हएबल BIS-अप्रुव्ड बॅटरी देत आहे. हिला पेडल असिस्ट सेंसर आहे. या बॅटरीमध्ये पेडल अथवा ऑटोमॅटिक मोडसह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. या ई-बाइकची बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर, तब्बल 120KM पर्यंत रेंज देते, असा दावाही कंपनीने केला आहे. याशिवाय, या बाइकमध्ये इग्निशनचे स्विच, हँडल लॉक, रिअर आणि फ्रंट डिस्क ब्रेक, तसेच हाइड्रॉलिक रिअर शॉकर देण्यात आले आहे.
URBN ई-बाइक एक स्मार्ट ई-सायकल आहे. जी एका इंटिग्रेटेड स्मार्ट फोन अॅपसह येते. हीचे वजन केवळ 40 किलो ग्रॅम एवढे आहे. तसेच हिची टॉप स्पीड 25kmph एवढी आहे. हीची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यास 4 तास लागतात.