रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी भारतातीलच नव्हे, तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानींच्या ताफ्यात एकापेक्षा एक महागड्या आणि लग्जरी कारचा समावेश आहे. नुकतंच मुकेश अंबानींच्या कुटुंबानं आपल्या ताफ्यात तिसऱ्या रॉल्स रॉयस कारचा समावेश केला. माध्यमांमधील वृत्तानुसार मुकेश अंबानींच्या ताफ्यात दाखल झालेली नवी कार देशातील सर्वात महागडी कार आहे आणि या कारवर १ कोटी रुपये खर्च करून पेंट करण्यात आला आहे.
रॉल्स रॉयसच्या कार एकतर खूप महागड्या आणि कस्टमायजेशनसाठी खूप लोकप्रिय आहेत. युझर्स आपल्या पसंतीनुसार कारमध्ये बदल करू शकतात. आता मुकेश अंबानींनी खरेदी केलेल्या नव्या रॉल्स रॉयस कारमध्ये नेमके काय बदल करण्यात आलेत ते जाणून घेऊयात.
१३.१४ कोटींची काररोल्स-रॉयल कलिनन कार मुकेश अंबानींच्या सिक्युरिटी कारच्या फ्लीटमध्ये मर्सिडिज-AMG आणि MG Gloster सोबत दिसून आली आहे. पीटीआयनं केलेल्या दाव्यानुसार रोल्स-रॉयस कलिनन कारची किंमत १३.१४ कोटी रुपये इतकी आहे. तर या कारच्या बेस मॉडलची किंमत ६.८ कोटी रुपये आहे. कस्टमायझेशनमुळे कारच्या किमतीत वाढ होत जाते.
१ कोटी रुपयांचा पेंटमुकेश अंबानी यांनी कस्टमायझेशनमध्ये नेमके कारमध्ये कोणकोणते बदल केलेत याची माहिती मिळू शकलेली नाही. पण अंबानींच्या नव्या रोल्स रॉयस कारला शानदार टस्कन सन कलर शेड पेंट देण्यात आला आहे. त्यामुळे कारला सर्वोत्तम रोड प्रेझेन्स प्राप्त होतो. कार इतरांपेक्षा यामुळे वेगळी ठरते आणि उठून दिसते. कारला हटके पेंट करण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
१२ लाख रुपयांची नंबर प्लेटअंबानींनी कारच्या नंबरसाठी नव्या सीरिजसाठी रजिस्ट्रेशन केलं. त्यामुळे फक्त नंबर प्लेटसाठी अंबानींनी १२ लाख रुपये खर्च केले आहेत. व्हीआयपी नंबरसाठी सामान्यत: ४ लाख रुपयांचा खर्च येतो. पण अबांनींनी थेट १२ लाख रुपये खर्चून नंबर प्लेट मिळवली आहे. मुकेश अंबानींनी नव्या कलिननसाठी ''०००१'' रजिस्ट्रेशन नंबर घेतला आहे.
अंबानींचं Rolls-Royce कलेक्शनमुकेश अंबानींकडे याआधीपासूनच रोल्स रॉयस कारचं कलेक्शन आहे. अंबानींच्या गॅरेजमध्ये रोल्स रॉयस फॅन्टम ड्रॉपहेट कूप देखील आहे. कलिनन व्यतिरिक्त अंबानींच्या ताफ्यात तीन रोल्स रॉयस कार आहेत. यात न्यू जनरेशन फॅन्टम एक्सटेंडेड व्हीलबेलचा देखील समावेश आहे. ज्याची किंमत १३ कोटी रुपये आहे.