देशातील प्रमुख इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंपनी नाहक मोटर्सनं देशांतर्गत बाजारात आपल्या नव्या इलेक्ट्रीक सायकल्स गरुणा आणि जिप्पीचं बुकिंग सुरू केलं आहे. या दोन्ही सायकल्सचं उत्पादन पूर्णपणे भारतात करण्यात आलं आहे. तसंच या संपूर्ण मेड इन इंडिया सायकल्स आहेत. निरनिराळ्या टप्प्यांमध्ये या सायकल्सचं बुकिंग सुरू करण्यात येणार आहे. पहिला टप्पा २ जुलै ते ११ जुलैदरम्यान सुरू राहणार आहे.
या सायकल्स तुम्हाला कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून बुक करता येतील. तसंच ऑनलाईन बुकिंगसाठी आवश्यक माहिती द्यावी लागेल. तसंच २,९९९ रूपये देऊन या सायकल्स बुक केल्या जाऊ शकतात. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी १३ जुलैपासून या सायकल्सच्या डिलेव्हरीबाबत अधिक माहिती देण्यास सुरूवात करतील. तसंच याची होम डिलिव्हरी १३ ऑगस्टपासून सुरू केली जाईल.
Yezdi च्या दमदार Roadking साठी व्हा तयार; लवकरच लाँच होणार ही पॉवरफुल मोटरसायकल
कंपनीनं गरुडा मॉडेलची किंमत ३१,९९९ रूपये आणि झिप्पी मॉडेलची किंमती ३३,४९९ इतकी निश्चित केली आहे. कंपनीच्या यो दोन्ही इलेक्ट्रीक सायकल्समध्ये अॅडव्हान्स्ड फीचर्स आणि तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. या दोन्हीमध्ये एलईडी डिस्प्ले आणि पॅडल सेन्सरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसंच यामध्ये देण्यात आलेली स्वॅपेबल बॅटरी संपूर्ण चार्ज होण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागतो.
सहजरित्या चार्ज करता येणारया सायकलची बॅटरी सहजरित्या घरीच चार्ज करणं शक्य आहे. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर इलेक्ट्रीक सायकल ४० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. रस्त्यांवर ई सायकल चालण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज भासत नाही. नाहक मोटर्सनं दावा केला आहे की या सायकल्सची रनिंग कॉस्ट केवळ १० पैसे प्रति किलोमीटर इतकी आहे.