नवी दिल्ली : कार शौकिनांचे एक वेगळेच विश्व असते. भारतातही अनेक कार शौकिन आहेत. यातच नसीर खान यांचे नाव आहे. नसीर खान हे प्रत्येक महागड्या कारचे मालक आहेत. एवढेच नाही तर ते आता भारतातील सर्वात महागड्या सुपरकारचे पहिले ग्राहक आणि मालक बनले आहे. दरम्यान, ब्रिटीश कंपनी मॅकलेरन 765 एलटी स्पायडर सुपर कार नसीर खान यांनी नुकतीच मोठी रक्कम भरून खरेदी केली आहे.
नसीर खान हे हैदराबादचे मोठे उद्योगपती आहेत. हैदराबाद शहरात त्यांचा वेगळाच रुबाब आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी भारतातील सर्वात महागडी सुपरकार मॅकलेरन 765 एलटी स्पायडर खरेदी केली आहे, या कारची किंमत 12 कोटी रुपये आहे. काटरेक. कॉमच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नसीर खान यांना अलीकडेच ताज फलकनुमा पॅलेसमध्ये सुपरकारची डिलिव्हरी मिळाली.
रिपोर्टनुसार, ते बहुधा भारतातील 765 एलटी स्पायडरचे पहिले ग्राहक आहेत. ब्रिटिश लक्झरी सुपरकार निर्माता कंपनी मॅकलेरन ऑटोमोटिव्हने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतीय बाजारपेठेत एन्ट्री केली होती. ही 3.72 कोटी रुपयांपासून सुरू होणाऱ्या किंमतीसह सहा सुपरकार ऑफर करते आणि सर्वात महाग 765 एलटी स्पायडर सुमारे 12 कोटी रुपये आहे.
इंस्टाग्रामवर चांगली फॅन फॉलोइंगउद्योजक आणि कार संग्राहक नसीर खान यांनी एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये आपल्या मौल्यवान कारचे फोटो शेअर केले आहेत. लाल रंगाच्या सुपरकारसोबत पोज देताना नसीन खानने लिहिले, "घरी स्वागत आहे मॅकलेरन 765 एलटी स्पायडर, या सौंदर्याची डिलिव्हरी घेण्यासाठी किती भव्य ठिकाण आहे!"
आतापर्यंतची सर्वात वेगवान कन्वर्टिबल काररिपोर्टनुसार, 765 एलटी स्पायडर हे मॅकलेरनने आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्वात वेगवान कन्वर्टिबल कारपैकी एक आहे. हे कूप आवृत्तीप्रमाणेच अत्यंत वायुगतिकीय डिझाइन देते. सुपरकारच्या बॉडीवर्कसाठी कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे आणि कारला अधिक आक्रमक फ्रंट बंपर, स्प्लिटर, साइड स्कर्ट आणि रॅपराऊंड रिअर बंपर मिळतो. ही परिवर्तनीय आवृत्ती असल्याने सुपरकारचे छप्पर केवळ 11 सेकंदात खाली येते. नसीर खान यांच्या आलिशान कारच्या कलेक्शनसाठी ओळखला जातो. तो इन्स्टाग्रामवर अनेक आलिशान कारसोबत पोज देताना दिसत आहे.