शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

आवश्यक हत्यारांचे टूलकीट नेहमीच सज्ज असणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:34 PM

कारमध्ये आवश्यक अशी हत्यारे असणे अडीअडचणीच्या कामाला गरजेची असतात. ती नीट ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. मेकॅनिक काही प्रत्येकवेळी तुम्हाला मिळत नाही वा उपयोगाला येत नाही, तुमचे काम काहीवेळा तुम्हालाच करावे लागते. 

कार- मोटार ही तुमची एक जबाबदारी असते, त्या कारचा वापर तुम्ही तुमच्या केवळ कुटुंबासाठी वा तुमच्यासाठी करीत असला तरी कारच्या प्रवासामध्ये येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणींसाठी काही हत्यारे, साधनसामग्रीचा एक आवश्यक असा संच आपल्या कारमध्ये तयार आहे की नाही, तो खराब झालेला नाही, याचीही खात्री करीत जा. अनेकदा कार पंक्चर होण्याचे, दरवाजा नीट न लागण्याचे, वायपर बदलण्याचे, हेडलॅम्प वा टेललॅम्प बदलण्याचे प्रसंग येत असतात. त्या त्यावेळी तुम्हाला मेकॅनिक मिळेलच असे नाही. तसेच अनेक कामे ही मेकॅनिकऐवजी तुम्हीच स्वतः करू शकता. पण होते काय की बहुतांशीवेळा आपण ती कामे मेकॅनिक मिळाल्याने विनासायास करून घेतो. त्यामुळे आपल्या कारमध्ये असलेल्या साधनांचा वापरही होत नाही, त्या साधनांकडे पाहाण्याचीही आपल्याला गरज वाटत नाही. मात्र काहीवेळा नेमकी गरज लागते तेव्हा त्या साधनांना आपण हातात घेतो, त्यावेळी नेमकी ती काही ना काही खराब असल्याचे, अस्वच्छ वा गंज चढल्यासारखी असल्याचे आढळून येते. अगदी साधी पकड घ्यायची म्हटली तरी ती अनेक महिने वापरली नसेल, नीटपणे ठेवलेली नसेल तर ती गंज पकडला गेल्यास वापरता येणे कठीण होते. मग त्यात रॉकेलचा वापर करून तिचा गंज सोडवून ती पकड कामासाठी सुकर होईल, अशी करून घ्यावी लागते. स्क्रूड्रायव्हर नुसताच ठेवला असेल तर खराब होणार नाही. मात्र त्याच्या मुठीला काही ना काही दमटपणामुळे ओशटपणा येण्याचीही शक्यता असते. कारमध्ये आवश्यक अशा टुल कीटमध्ये कार उचलण्याचा जॅक, पाना, स्क्रूड्रायव्हर, साधी पकड, नोज प्लायर, इन्शुलेशन टेप, ब्लेड, छोटी हॅक्सॉ, कात्री, कटर, टूसाईड अडेसिव्ह टेप, हेडलॅम्पचे अतिरिक्त बल्ब, टॉर्च, ऑईल, कॉटनवेस्ट (हात पुसण्यासाठी किमान पातळसर कॉटनचे फडकं) किमान या साधनांचा संच नेहमी कारमध्ये नीटपणे ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकवेळी काही कामांना मेकॅनिक मिळेल असेही नाही, इतकेच कशाला काहीवेळा काही कामे मेकॅनिक ऐवजी तुम्हालाच करणे भाग पडत असते, हे लक्षात घेता अशा प्रकारच्या कामांसाठी टूल कीट चांगल्या स्थितीत तुम्हाला मिळाला तर त्याद्वारे काम करता येऊ शकते. तसेच त्या साधनांना आयत्यावेळी साफसूफ करण्याची आवश्यकता भासणार नाही.