कोरोना महामारीमुळे ऑटोमोबाईल सेक्टरला मोठा सेटबॅक मिळाला होता. आता कुठे हे क्षेत्र स्थिरस्थावर होत आहे. परंतू सेमीकंडक्टरच्या टंचाईमुळे वाढलेली मागणी कंपन्या वेळेत पूर्ण करू शकत नाहीएत. याचा फटका कार कंपन्यांसह ग्राहकांना बसत आहे. यामुळे ग्राहकांचा वेटिंग पिरिएड वाढतच चालला असून गाड्यांच्या किंमतीदेखील वाढू लागल्या आहेत.
एका अंदाजानुसार देशात 7 लाख लोकांना नव्या कार हव्या आहेत, परंतू त्यांना त्या वेळेत मिळत नसल्याने रांगेत रहावे लागले आहे. या सात लाख लोकांनी गाडी खरेदी करण्यासाठी बुकिंग केली आहे, मात्र त्यांना डिलिव्हरी मिळालेली नाही. महत्वाचे म्हणजे या बुकिंग ज्या प्रमाणावर वाढत आहेत, त्या प्रमाणात गाड्या मिळत नाहीत. यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक गाड्यांवर एकेक, दीड वर्षांपर्यंत वेटिंग आहे.
हे लोक एकाच किंवा काही मोजक्याच गाड्यांसाठी थांबले आहेत असे नाही, तर प्रत्येक प्रकारच्या गाडीवर वेटिंग आहे. मारुती, टाटा मोटर्स आणि महिंद्राकडे एक-एक लाख लोक वाट पाहत आहेत. तर किया मोटर्सकडे 75 हजार लोकांची वेटिंग लिस्ट आहे. कंपन्यांकडे मागणी असूनही त्या कार डिलिव्हर करण्यात अपयशी ठरत आहेत.
सेमीकंडक्टर चिपने फक्त ऑटोमोबाईलच नाही तर जगभरातील 170 इंडस्ट्रीजची नाकेबंदी केली आहे. सेमीकंडक्टर चिपच्या टंचाईमुळे ऑटो इंडस्ट्रीला जवळपास 150 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नव्या गाड्या मिळत नसल्याने सेकंड हँड गाड्यांना भारीच डिमांड आली आहे. नव्या कारची टंचाई आणि त्यात कंपन्या दर वाढवत असल्याने लोक आता सेकंड हँड कारकडे वळू लागले आहेत.
संबंधीत बातम्या...
Sedan Vs. SUV Cars: सेदान सोडून एसयुव्हींच्या का मागे लागलेत लोक? ही आहेत पॉप्युलर होण्याची कारणे...
Zoomcar Extra Income: मोठी संधी! तुमची खासगी कार Zoomcar शी शेअर करा; पैसे कमवा, नवी ऑफर लाँच