चीनमधील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी BYD ने आपली नवी इलेक्ट्रिक कार सीगल (Seagull) 2023 शंघाई ऑटो शोमध्ये सादर केली आहे. विशेष म्हणजे कंपनीने या 5 डोअर मॉडेलच्या बुकिंगलाही सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या इलेक्ट्रिक कारला केवळ 24 तासांतच 10 हजारहून अधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. हिची किंमत CNY 78,800 (जवळपास 9.4 लाख रुपये) ते CNY 95,800 (जवळपास 11.43 लाख रुपये) पर्यंत आहे. एवढी कमी किंमत असूनही ही इलेक्ट्रिक कार 405Km ची रेंज देते. यात 70 kW (94 bhp) क्षमतेची मोटर आणि 38 kWh पर्यंतचे बॅटरी पॅक देण्यात आले आहे. हिची टॉप स्पीड 130km/h पर्यंत आहे.
सीगल 5-डोर इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे. या कारमध्ये प्रोजेक्टरसह आइस-ब्रेकिंग आइज हेडलाइट्स आणि कनेक्टिंग LED टेल लाइट्ससह सुंदर साइड आणि रिअर प्रोफाइल देण्यात आले आहे. या कारला नॅनोप्रमाणेच सिंगल विंडशील्ड वायपर, पुल-अप स्टाइल डोर हँडल आणि स्टाइल कव्हर सह स्टील व्हील्स देण्यात आले आहे.
सीगल इलेक्ट्रिक कारचे फीचर्स -सीगल इलेक्ट्रिक कारच्या इंटेरिअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 5-इंचाचे इंस्ट्रूमेंट कंसोल, 12.8-इंचाचे इंफोटेनमेंट स्क्रीन, फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग व्हील, लेयर्ड डॅशबोर्ड, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, इंटीग्रेटेड वायरलेस चार्जिंग पॅड आणि कप होल्डर्स देण्यात आले आहेत.
सीगल इलेक्ट्रिक कारची बॅटरी- सीगलला BYD च्या ई-प्लॅटफॉर्म 3.0 स्कॅटबोर्डवर तयार करण्यात आले आहे. हिचा 30 kWh बॅटरी पॅक 305Km ची रेंज देतो. तर 38 kWh बॅटरी पॅक 405Km ची रेंज देतो. हिची टॉप स्पीड 130 km/h पर्यंत आहे.
कंपनीने हे कार अशा ग्राहकांसाठी तयार केले आहे, ज्यांची फ्युअल वाहनांवरून इलेक्ट्रिक वाहनांवर स्विच होण्याची इच्छा आहे. जर ही कार भारतीय बाजारात लॉन्च झाली, तर Tata Tiago EV, Tata Nexon EV ला टक्कर देऊ शकतो. कारण Tiago EV ची सुरुवातीची किंमत 8.69 लाख ते 11.99 लाख रुपये एवढी आहे. तर सीगल कमी किमतीत अधिक रेंज आणि प्रीमियम फील देते.