इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये सातत्याने नव-नव्या कंपन्यांची एन्ट्री होताना दिसत आहे. आता इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनी बाज बाइक्सनेही (Baaz Bikes) या सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. कंपनीने आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर Baz लॉन्च केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत केवळ 35 हजार रुपये एवढी असणार आहे. या स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. अर्थात, बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवरून या स्कूटरची बॅटरी बदलून, आपण नॉनस्टॉप प्रवास करू शकाल. या स्कूटरची टॉप स्पीड 25km/h एवढी आहे. यामुळे आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्सची गरजही भासणार नाही. ही ई-स्कूटर आयआयटी-दिल्ली येथील ईव्ही स्टार्ट-अपने डिझाइन आणि डेव्हलप केले आहे.
90 सेकंदांत बदलणार बॅटरी -बाज इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी केवळ 90 सेकेंदांतच बदली जाऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. एवढेच नाही, तर जे लोक दिवसभरातत 100km हून अधिकचा प्रवास करू शकतात त्यांच्यासाठी ही इलेक्ट्रिक स्कूटर अत्यंत उपयोगी आहे, असेही कंपनीने म्हटले आहे. मात्र, या स्कूटरच्या रेंज संदर्भात अद्याप कंपनीने कसल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही. ही स्कूटर कंपनीच्या ऑफिशियल रेंटल पार्टनरच्या माध्यमाने भाड्यानेही घेतली जाऊ शकते. या स्कूटरची लांबी 1624mm, रुंदी 680mm आणि ऊंची 1052mm एवढी आहे.
टॉप स्पीड 25km/h -बाज इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीत अॅल्युमिनियम केसिंगमध्ये फिट लिथियम-ऑयन सेल असलेले पॉड्स देण्यात आले आहेत. याचे वजन 8.2 किलोग्रॅम एवढे आहे. हिची एनर्जी डेंसिटी 1028Wh एवढी आहे. तसेच ही IP68 रेटेड अर्थात वॉटरप्रूफ आणि स्प्लॅश प्रूफ आहे. महत्वाचे म्हणजे, या स्कूटरमध्ये एक विशेष सेफ्टी फीचरही देण्यात आले आहे. जे आग लागल्यानंतर, पाणी भरल्यानंतर अथवा अशा प्रकारच्या एखाद्या स्थितीत रायडरला अलर्ट करते. हिची टॉप स्पीड 25km/h एवढी आहे. यामुळे हिला चालविण्यासाठी लायसन्सची आवश्यकता नाही.
स्वॅपिंग प्लॅटफॉर्ममध्ये 9 बॅटरीची सुविधा -या स्कूटरमध्ये फाइंड माय स्कूटर नावाचे बटनही देण्यात आले आहे. यामुळे आपण आपली स्कूटर पार्किंगमध्ये सहजपणे शोधू शकता. ही स्कूटर पूर्णपणे की लेस आहे. स्कूटरच्या समोर इव्हिल फोर्क हायड्रॉलिक सस्पेन्शन सेटअप आणि रिअरमध्ये इयूल शॉक अॅब्झॉर्बर देण्यात आले आहे. हिच्या स्वॅपिंग प्लॅटफॉर्ममध्ये 9 बॅटऱ्या फिक्स केल्या जाऊ शकतात. यामुळे आपल्याला बॅटरी स्वॅप करणे सहज शक्य होईल. हे स्टेशन हवामानाच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आले आहेत. पाऊस आणि धुळीसाठी याला ऑल वेदर IP65 रेटिंग देण्यात आली आहे.