नवी दिल्ली : बंगळुरू येथील इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी Ather Energy उद्या म्हणजेच मंगळवारी ऑल-न्यू जेन-3 450X इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. नवीन मॉडेल सध्याच्या मॉडेलची जागा घेईल. मात्र, सध्या याच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची अधिकृत माहिती समोर आलेली नाही, हे मंगळवारी समोर येईल.
नवीन Ather 450X मोठ्या 3.66kW लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येण्याची शक्यता आहे. त्याचे पॉवर आउटपुट 6.4kWh च्या जवळ असू शकते. रॅप, राइड, स्पोर्ट, इको आणि नवीन स्मार्ट इको असे पाच राइडिंग मोड असतील.विशेष म्हणजे, सर्व पाच मोड सँडर्ड व्हर्जनमध्ये ऑफर केले जाऊ शकतात. त्याचवेळी, दुसरे व्हर्जन कमी बॅटरी क्षमता आणि चार राइडिंग मोडसह येईल.
रॅप मोडमध्ये स्कूटर मॅक्सिमम पॉवर जनरेट करू शकते, इकोमध्ये कमी केली जाईल. स्पोर्ट मोडमध्ये याचे पीक आणि नॉमिनल पॉवर आउटपुट अनुक्रमे 5.8kW आणि 3.1kW असू शकते. मोठ्या बॅटरी क्षमतेसह, नवीन Ather 450X एका चार्जवर 146 किमीची रेंज देऊ शकते. दुसऱ्या सेटिंगमध्ये इलेक्ट्रिक रेंज 108km असेल. इलेक्ट्रिक स्कूटरचे सध्याचे मॉडेल 2.6kW बॅटरी पॅकसह येते.
नवीन मॉडेल सध्याच्या मॉडेलपेक्षा 25 मिमी लांब आणि 11 मिमी जास्त असू शकते. याचे व्हीलबेस देखील पूर्वीपेक्षा 9 मिमी लांब असू शकतो. मात्र, त्याच्या रुंदीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. कंपनी स्कूटरमध्ये काही नवीन फीचर्स देखील जोडू शकते. सध्या मॉडेल 7.0-इंच टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल डॉक्युमेंट स्टोरेज, इंटिग्रेटेड 4G LTE सिम कनेक्टिव्हिटी, रिव्हर्स मोड आणि पूर्ण एलईडी लाइटिंगसह येते.
नवीन Ather 450X आपल्या मोठ्या बॅटरी पॅक आणि मोटरमुळे किमतीत किरकोळ वाढ करेल. मात्र, मोठ्या बॅटरीमुळे अधिक FAME-II सबसिडी मिळेल. पण, तूर्तास किंमतीसाठी आणखी एक दिवस वाट पाहावी लागणार आहे.