शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

ग्राहकांच्या पसंतीस उतरली नवीन Maruti Swift; दहा दिवसांत मिळाल्या 10 हजार बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 20:06 IST

New Gen Maruti Suzuki Swift : ही कार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यात आली आहे. यात 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलसारखे फिचर्स मिळतात.

New Gen Maruti Suzuki Swift : देशातील आघाडीची ऑटोमोबाईळ कंपनी Maruti Suzuki ने काही दिवसांपूर्वीच न्यू जनरेशनची  Swift भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. कंपनीने या कारची किंमत एक्स-शोरुम 6.49 लाख ते 9.65 लाख रुपये दरम्यान ठेवली आहे. या मॉडेलमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल, फिचर अपग्रेड आणि ऑल-न्यू Z सिरीज इंजिन मिळेल. विशेष म्हणजे, या कारचे बुकिंग 1 मे पासून सुरू झाले होते. बुकिंग विंडो उघडल्यानंतर अवघ्या 10 दिवसांत या कारसाठी 10,000 बुकिंग प्राप्त झाल्या आहेत.

व्हेरिएंट, इंजिन अन् मायलेजनवीन स्विफ्ट लाइनअपमध्ये पाच प्रकार LXi, VXi, VXi (O), ZXi आणि ZXi+ मिळेल. या सर्व प्रकारात नवीन 1.2 L, 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन असेल. कंपनीच्या दाव्यानुसार, कारचे इंजिन मॅन्युअल ट्रांसमिशनसह 24.8kmpl आणि AMT गिअरबॉक्ससह 25.72kmpl मायलेज देईल. जुन्या K12 पेट्रोल इंजिनच्या तुलनेत नवीन Z-सिरीज इंजिन 3kmpl जास्त मायलेज देईल. तसेच, हे इंजिन 82bhp पॉवर आणि 112Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

कारचा बाहेर आणि आतील भागकारचे ओव्हरऑल डिझाइन आणि इंटीरिअर आधीसारखेच आहे, पण आता ही पूर्वीपेक्षा अधिक शार्प झाली आहे. कंपनीने यात नवीन बंपर आणि नवीन डिझाइन केलेले रेडिएटर ग्रिल दिले आहेत. याशिवाय, ब्रँडचा लोगो जो आधी ग्रिलवर असायचा, तो आता कारच्या बोनेटवर लावण्यात आला आहे. नवीन हेडलॅम्प आणि फॉग-लॅम्प कारला पूर्णपणे फ्रेश लुक देतात. 

कारच्या इंटिरिअरला स्मार्ट लुक देण्यात आला आहे. याचे केबिन फ्रॉन्क्ससारखेच आहे. यात फ्री-स्टँडिंग इन्फोटेनमेंट सिस्टीम, नवीन स्टाइल सेंटर एअर-कॉन व्हेंट्स देण्यात आले आहेत. ही कार पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यात आली आहे. याच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग मिळतात. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलदेखील मिळतो.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार