शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

Honda Activa: सज्ज व्हा! होंडाची नवी Activa येतेय, कंपनीकडून लूक जारी; कशी दिसते पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 5:08 PM

तुम्ही होंडा कंपनीच्या Activa स्कूटरचे चाहते असाल किंवा नवी स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.

तुम्ही होंडा कंपनीच्या Activa स्कूटरचे चाहते असाल किंवा नवी स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. कारण होंडा कंपनी लवकरच एक मोठं गिफ्ट देणार आहे. भारतातील सर्वाधिक विक्री होणारा स्कूटर म्हणून ओळख असलेल्या Activa चं नवं व्हर्जन कंपनी लॉन्च करणार आहे. 

कंपनीनं नव्या अ‍ॅक्टीव्हाचं एक पोस्टर देखील जाहीर केलं आहे. होंडा कंपनी लवकरच Activa 7G बाजारात आणणार असल्याचं बोललं जात आहे. सध्यातरी कंपनीकडून नव्या स्कूटरबाबत अधिक कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

होंडाचं Activa 6G आणि Activa 125 हे मॉडल्स सर्वाधिक विक्री होणारे मॉडल्स आहेत. पण लवकरच आता अ‍ॅक्टीव्हाचं नवं व्हर्जन येणार असल्याचं उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नव्या अ‍ॅक्टीव्हामध्ये कोणकोणते बदल पाहायला मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

नव्या स्कूटरमध्ये काय पाहायला मिळू शकतं?होंडाच्या या नवीन पोस्टरमध्ये स्कूटरचा फक्त पुढचा भाग दिसत आहे. फ्रंट लूकवरून हे नक्कीच समजू शकतं की ही स्कूटर Activa चं पुढचं व्हर्जन असणार आहे. पण Activa 125 cc नक्कीच नाही. लूक पाहता नवीन अ‍ॅक्टिव्हाचे इंडिकेटर हेडलाइटमध्येच इंटिग्रेट करण्यात आलेले आहेत. 

नव्या स्कूटरकडून अपेक्षा कोणत्या?Honda नं जर 7G मॉडेल लॉन्च केलं, तर त्यात 6G मध्ये नसलेली सर्व वैशिष्ट्ये असतील. Activa 6G सध्या BS6 इंजिन आणि काही नव्या फिचर्ससह उपलब्ध आहे. Active 7G मध्ये काही नवीन पॉवर फीचर्स दिले जाऊ शकतात, जसे की 110 cc मोटर इंजिन 7.68 bhp आणि 8.79 Nm पॉवर जनरेट करेल. याशिवाय अशा काही गोष्टी असतील ज्या 6G मध्ये नाहीत. तसंच नव्या स्कूटरमध्ये पेट्रोल टँकची जागा बदलण्यात येणार का हे पाहणं देखील महत्वाची असणार आहे. 

टॅग्स :HondaहोंडाAutomobileवाहन