शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

Honda Amaze : होंडाची नवीन कार दिवाळीपूर्वी येणार, टिगोर आणि डिझायरला टक्कर देणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 4:51 PM

Honda Amaze : कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये कारच्या कमतरतेसोबत अमेझचे नवीन अपडेटेड मॉडेल होंडाची विक्री वाढविण्यात मदत करू शकते. 

नवी दिल्ली : होंडा आपल्या लोकप्रिय कार अमेझचे थर्ड जनरेशन मॉडेल लाँच करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, नवीन सेडान या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये देशात लाँच केली जाऊ शकते. अमेझचे सेकंड जनरेशन मॉडेल 2018 मध्ये लाँच करण्यात आले होते. तर थर्ड जनरेशनची ही नवीन कार दिवाळीच्या आसपास बाजारात आणली जाईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये कारच्या कमतरतेसोबत अमेझचे नवीन अपडेटेड मॉडेल होंडाची विक्री वाढविण्यात मदत करू शकते. 

ज्या प्लॅटफॉर्मवर सिटी आणि एलिव्हेट तयार करण्यात आली, त्याच प्लॅटफॉर्मवर नवीन होंडा अमेझ तयार केली जाणार आहे. या प्लॅटफॉर्मनुसार, नवीन अमेझमध्ये बदल केले जातील. कारचा व्हीलबेस होंडा सिटी (2600mm) पेक्षा कमी असू शकतो. अमेझच्या सध्या विकल्या गेलेल्या मॉडेलचा व्हीलबेस 2470mm आहे, म्हणजेच तो होंडा सिटी पेक्षा 130mm कमी आहे. नवीन अमेझ देखील या व्हीलबेससह येईल.

डिझाईनडिझाईनबद्दल बोलायचे झाले तर नवीन जनरेशनची होंडा अमेझ स्टायलिश लूकमध्ये येईल. कारची स्टाइल होंडाच्या इतर अत्याधुनिक गाड्यांसारखीच असेल. तसेच, नवीन अमेझ सध्याच्या जनरेशनच्या होंडा एकॉर्ड सेडान प्रमाणे स्टायलिश केली जाऊ शकते, असेही म्हटले जाते.

फीचर्सन्यू अमेझचे लेआउट आणि फीचर्स होंडा एलिव्हेटशी मिळते जुळते असू शकतात. यामध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले जाऊ शकतात. कारचे अनेक इंटिरिअर पार्ट्स नवीन होंडा सिटी आणि एलिव्हेटसारखे असतील.

सेफ्टीनवीन होंडा अमेझमध्ये होंडाच्या सेन्सिंग टेक्नॉलॉजी पॅकेज उपलब्ध असेल, असेही काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS), लेन कीप असिस्ट, रोड डिपार्चर वॉर्निंग, लेन चेंज वॉर्निंग, ॲडव्हान्स्ड ब्रेकिंग सिस्टीम, ऑटोमॅटिक हाय बीम असिस्ट आणि ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सिस्टीम देण्यात येऊ शकते.

इंजिनथर्ड जनरेशन अमेझला 1.2 लिटर, 4-सिलिंडर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन दिले जाऊ शकते. हा सेटअप 90bhp पॉवर आणि 110Nm टॉर्क जनरेट करू शकतो. इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन दिला जाऊ शकतो. 

टॅग्स :Honda Amazeहोंडा अमेझHondaहोंडा