(Image Credit:Overdrive)
नवी दिल्ली : होंडा कार्सने बुधवारी नव्या जनरेशनची अमेझ कॉम्पॅक्ट सिडान कार लॉन्च केली आहे. असे बोलले जात आहे की, या कारची थेट स्पर्धा सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या मारुती डिझायर आणि लवकरच लॉन्च होत असलेल्या फोर्ड एस्पायर फेसलिफ्टसोबत असणार आहे. चला जाणून घेऊया होंडाच्या नव्या कारची खासियत..
दोन इंजिन पर्यायात असेल कार
होंडाची नवीन कार पूर्णपणे नव्या बेस्डवर तयार करण्यात आली आहे. आणि ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायात उपलब्ध असेल. होंडाने दावा केलाय की, या कारमध्ये अधिक चांगली रिअऱ सीट स्पेस आणि बूट कपॅसिटी असेल.
आकर्षक कॅबिन थिम
कार इंटेरिअर दर्जेदार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या कारच्या कॅबिन फर्निशिंगसाठी बीज आणि ब्लॅक रंगाची थिम वापरण्यात आली आहे. यासोबतच या कारमध्ये मोठा टचस्क्रीन इन्फोटेन्मेट सिस्टम देण्यात आला आहे.
पेट्रोल व्हेरिएंटचं इंजिन
या कारमध्ये 1.2 लिटरचं 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 89 बीएचपीची पावर आणि 110 एनएमचा टार्क जनरेट करतं.
डिझेल इंजिन
डिझेल व्हेरिएंटच्या इंजिनाबाबत सांगायचं तर या कारमध्ये 1.5 लिटरचं 4 सिलेंडर इंजिन देण्यात आलंय. हे इंजिन 98 बीएचपीची पावर आणि 200 एनएमचा टार्क जनरेट करतं.
किती असेल किंमत
होंडाच्या अमेज कारची किंमत 5.59 लाख रुपयांपासून(एक्स शोरुम) सुरु होते. कंपनी सुरुवातीच्या 20 हजार ग्राहकांना ही स्पेशल किंमत देणार आहे.