नवी दिल्ली : ह्युदांईने (Hyundai) आपल्या सर्वात मोठ्या एसयूव्ही सॅन्टा फेचे (Santa Fe) ऑफिशियल फोटो शेअर केले आहेत. कंपनीने Santa Fe एसयूव्ही बॉक्सी डिझाइनसह सादर केली आहे, जे लँड रोव्हर डिफेंडरशी ( Land Rover Defender) जास्त साम्य आहे. एसयूव्ही ऑगस्ट 2023 मध्ये जागतिक स्तरावर पदार्पण करणार आहे. दरम्यान, ह्युंदाईची ही एसयूव्ही कार लँड रोव्हर डिफेंडरशी टक्कर देणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
ह्युंदाई Santa Fe चे डिझाइननवीन ह्युंदाई Santa Fe सध्याच्या पिढीच्या मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसते, कारण ती आता बॉक्सी प्रोपोर्शनमध्ये आहे. एसयूव्हीमध्ये एक अपराइट नोज, एच-आकाराचे एलईडी डीआरएल, लांब व्हीलबेस, ग्रिलवर एच-आकाराचे आकृतिबंध आणि पुढील बंपरवर एअर डॅम देण्यात आले आहे. याशिवाय, कारला मागील बाजूस एच-आकाराचे टेल-लॅम्प देखील देण्यात आले आहेत. नवीन ह्युदांई Santa Fe मध्ये चारीबाजूने जाड बॉडी क्लेडिंग आणि मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स आहेत.
ह्युंदाई Santa Fe चे इंटिरिअरनवीन पिढीच्या ह्युदांई Santa Fe चे लीक झालेले फोटो अनेक रंगांसह कारच्या इंटिरिअरची झलक सुद्धा दाखवितात. केबिनच्या आत Santa Fe फिकट रंगीत सीट अपहोल्स्ट्री, एक मोठा फोल्डेबल डिस्प्ले, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरने सुसज्ज आहे. सध्याच्या-जनरल मॉडेलवर उपलब्ध असलेल्या दोन रो सिटिंगऐवजी Santa Fe ला तीन-रो सिटिंग मिळण्याची शक्यता आहे.
ह्युंदाई Santa Fe चे इंजिनह्युंदाई कंपनीने अद्याप आपल्या नवीन पिढीच्या Santa Fe चे यांत्रिक तपशील उघड केलेले नाहीत. सध्याच्या पिढीतील Santa Fe प्रमाणेच एसयूव्ही 2.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनद्वारे संचालित केले जाऊ शकते. कंपनी बाजारानुसार या आगामी एसयूव्हीला हायब्रिड आणि प्लग-इन हायब्रिड व्हेरिएंटमध्ये आणू शकते. दरम्यान, आपल्या माहितीसाठी नवीन पिढीची ह्युंदाई Santa Fe ऑगस्ट 2023 मध्ये अधिकृतपणे सादर केली जाईल आणि या वर्षाच्या अखेरीस प्रामुख्याने यूएसएमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.