नव्या पिढीतील ह्युंदाई वेरनाची (Hyundai Verna) प्रतीक्षा संपली आहे. दक्षिण कोरियातील वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईने भारतात नवी वेरना (2023 Hyundai Verna Launch) लॉन्च केली आहे. बाजारात हीची फाईट नव्या 2023 होंडा सिटी, स्कोडा स्लाव्हिया, फॉक्स वॅगन वर्टूस आणि मारुती सुझुकी सियाझसोबत असेल.
नवी वेरना EX, S, SX आणि SX (O) या चार ट्रिम्समध्ये सादर करण्यात आली आहे. यात दोन पेट्रोल इंजिन - 1.5L नेच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल (113.4bhp, 144Nm) आणि 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन (158bhp, 253Nm) ऑप्शन देण्यात आले आहे. या कारला नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल आणि iVT गिअरबॉक्सचे ऑप्शन आहे. तसेच, टर्बो पेट्रोल इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअलसह 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही आहे. जे 20.20kmpl पर्यंतचे मायलेज देऊ शकते.
या कारच्या 1.5L नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन व्हेरिअंट्सची किंमत 10.89 लाख रुपयांपासून 16.19 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल व्हेरिअंट्सची किंमत 14.83 लाख रुपयांपासून 17.37 लाख रुपयांदरम्यान आहे. या किंमती इंट्रोडक्टरी आहेत.
नव्या वेरनामध्ये ADAS ऑफर देण्यात आली आहे. याअंतर्गत या कारमध्ये 'स्टॉप अॅण्ड गो'सह अॅडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट कोलिजन अव्हॉइडन्स असिस्ट, लेन कीप असिस्ट, लेन फॉलोइंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, हाय बीम असिस्ट आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक कोलिजन अव्हॉइडन्स असिस्ट सारखे 17 फीचर्स देण्यात आले आहेत.
याशिवाय या कारमध्ये, डुअल-डिस्प्ले देण्यात आला आहे. यांपैकी एक 10.25-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आहे आणि दुसरा डिजिटल ड्रायव्हरचा डिस्प्ले आहे. याशिवाय 8-स्पीकर बोस साउंड सिस्टिम, नवे टच-बेस्ड क्लायमेट कंट्रोल पॅनल, ड्रायव्हर अॅडजस्टेबल पॉवर सीट, व्हेंटिलेटेड आणि हिटेड फ्रंट सीट्स देखील देण्यात आले आहे.