MPV कारचा विचार केल्यास, मारुती एर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा यांना किंग मानले जाते. मात्र, लवकरच या दोन्ही कारचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. कारण Kia आगामी ऑटो एक्सपो 2023 मध्ये आपली नवी कार्निव्हल सादर करत आहे. हे ग्लोबल मार्केटमध्ये आधीपासूनच असलेले चौथ्या जनरेशनचे मॉडेल असेल. हे बऱ्याच प्रमाणात एसयूव्ही डिझाइन आणि पुर्वीच्या तुलनेत मोठ्या साीजचे असेल. हे तीन लेआऊट- 7 सीटर, 9 सीटर आणि 11 सीटरमध्ये आणले जाऊ शकते. हिच्या 11 सीटर ऑप्शनमध्ये दोन छोट्या फॅमिली सहजपणे प्रवास करू शकतात.
न्यू किआ कार्निव्हल : फ्रेश लुक, अधिक स्पेस -सध्या बाजारात असलेल्या मॉडेलच्या तुलनेत नवी कार्निव्हल ही SUV सारखीच दिसते. या कारला डायमंड पॅटर्नसह स्लीक हेडलाइट्स आणि 'टायगर नोज' ग्रिल देण्यात आले आहे. किआने आपल्या या कार्निव्हलमध्ये बोनट लंबा करण्यासाठी ए-पिलरला मागे सरकरवले आहे. कार्निव्हलच्या मागील बाजूला LED टेल-लाइट्स एलईडी लाइट बारला जोडण्यात आला आहे. ही कार लांबीला 5.1 मीटर असू शकते. जी नुकत्याच लॉन्च झालेल्या टोयोटा इनोव्हा हाइक्रॉस पेक्षा अधिक लांब आहे.
फीचर्स -इंटिरिअरमध्ये नव्या कार्निव्हलमध्ये 12.3-इंचाचे दोन डिस्प्ले मिळतील. यांत एक इंस्ट्रूमेन्ट क्लस्टर आणि दुसरे टचस्क्रीन इंफोटेनमेन्ट असेल. यात थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, पॉवर्ड फ्रन्ट सीट्स, वायरलेस चार्जर, प्रीमियम साउंड सिस्टिम आणि लेन डिपार्चर वॉर्निंग, फॉरवर्ड कोलिसन असिस्ट आणि मल्टीपल एअरबॅग्स सारखे फीचर्स दिले जातील.
इंजिन आणि किंमत -ग्लोबल मार्केटमध्ये कार्निव्हल दोन इंजिन ऑप्शनमध्ये सादर केली जाते. एक 201hp, 2.2-लीटर डिझेल इंजिन आणि एक 296hp, 3.5-लिटर पेट्रोल इंजिन. भारतात केवळ डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. या नव्या कार्निव्हलची किंमत जवळपास 30 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते आणि तिचे टॉर व्हेरिअंट 40 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.