Mahindra Scorpio: अगदी गाव खेड्यापासून ते शहरांपर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या ज्या एसयूव्हीची प्रतिक्षा सर्वांना होती अशी स्कॉर्पियो एन (Scorpio N) आज संध्याकाळी साडेपाच वाजता भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहे. दरम्यान लॉन्चआधीच या जबरदस्त कारचे फिचर्स आणि किंमतही समोर आली आहे. महिंद्रानं टिझरमधून या नव्या स्कॉर्पियोला 'बिग डॅडी ऑफ एसयूव्ही' (Big Daddy of SUVs) असं म्हटलं आहे.
नव्या स्कॉर्पियोमध्ये असणार ५ ट्रिम्सस्कॉर्पियो-एनचा लूक आणि फिचर्स खरंतर याआधीच सर्वांसमोर आले आहेत. यात महिंद्रा एसयूव्ही ५ ट्रिम्समध्ये म्हणजेच Z2, Z4, Z6, Z8 आणि Z8L मध्ये लॉन्च होणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार स्कॉर्पियो-एन एसयूव्हीची किंमत १३ लाखांपासून सुरू होणार आहे.
एसयूव्ही मार्केटमध्ये देणार जोरदार टक्करबाजारात दाखल होण्याआधीच New Mahindra Scorpio N बाबत कुतुहल निर्माण झालं आहे. महिंद्राची स्कॉर्पियो एन एसयूव्ही बाजारात Tata Harrier, Tata Safari, Hyundai Creta आणि Hyundai Alcazar या कारना टक्कर देणार आहे. मिड रेंज एसयूव्ही मार्केटमध्ये आपला जम बसविण्याचा महिंद्राचा इरादा आहे. तसंच ग्राहकांना कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त फिचर्स मिळतील याचा विचार महिंद्रा कंपनीनं केला आहे. तसंच रॉयल लूक देऊन कंपनीला Toyota Fortuner च्या स्पर्धेत परवडणारा जबरदस्त पर्याय उपलब्ध करुन द्यायचा आहे.
'स्कॉर्पियो एन'चे फिचर्सडिझाइन आणि लूकच्या बाबतीत नवी स्कॉर्पियो जुन्या स्कॉर्पियोपेक्षा बरीच वेगळी असणार आहे. नव्या स्कॉर्पियोच्या फ्रंट लूकला स्पोर्टी टच देण्यात आला आहे. तर डीआरएल आणि हेडलॅम्पला क्रोम फिनिश देण्यात आलं आहे. तसंच ग्रिल डिझाइन देखील दमदार देण्यात आलं आहे. कारची लांबी 4662mm, रुंदी 1917mm, उंची 1849mm आणि व्हिलबेस 2750mm चा आहे.
महिंद्रानं XUV 700 मधील काही फिचर्स देखील नव्या स्कॉर्पियोमध्ये दिले आहेत. यात कनेक्टेड कार टेक्नोलॉजी उपलब्ध असणार आहे. तसंच तुम्हाला Alexa ची सुविधा देखील असणार आहे. महिंद्राकडून पहिल्यांदाच स्कॉर्पियोमध्ये सनरुफ देण्यात येणार आहे.
नवी स्कॉर्पियो पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होणार आहे. यात पेट्रोल व्हर्जनमध्ये २.० लीटर mStallion 150TGDi इंजिन देण्यात येईल. जे 200bhp पावर आणि 320Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. तसंच डिझेल व्हेरिअंटमध्ये 2.2 लीटरचं mHawk 130 इंजिन मिळणार आहे. हे इंजिन 130bhp पर्यंतची मॅक्सीमम पावर मिळणार आहे. नव्या स्कॉर्पियोमध्ये 4x4 ड्राइव्ह मोडसोबत ६-स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅकीट ट्रान्समिशन युनिटचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.