New Maruti Suzuki Alto K10 लाँच करण्यापूर्वी कंपनीने या लोकप्रिय हॅचबॅकचा टीझर रिलीज केला आहे. ह्या टिझरमध्ये कारची फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि डिझाइनबद्दल बरीच माहिती दिली आहे. मारुती सुझुकीनं हॅचबॅक सेगमेंटमध्ये वाढती मागणी पाहता आपली ही हॅचबॅक कार पुन्हा लाँच करण्याचा निर्णय घेतला होता.
कंपनीने जारी केलेल्या टीझर आणि रिपोर्टनुसार, नवीन मारुती अल्टो K10 एकदम नवीन डिझाइन, नवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह सादर केली जाणार आहे. नव्या कारची लांबी, रुंदी आणि उंची ही जुन्या कारपेक्षा अधिक असेल. Maruti Suzuki ही नवीन Maruti Suzuki Alto K10 भारतात 18 ऑगस्ट रोजी लाँच करेल. पण लाँचपूर्वीच कंपनीने त्याची प्री-बुकिंग देखील सुरू केली आहे.
काय आहे स्पेसिफिकेशन्स?मारुती अल्टो K10 च्या डायमेन्शनबद्दल सांगायचे तर, ही कार आधीच्या कारपेक्षा थोडी स्पेशिअस आहे. कंपनीने तिची लांबी 3530 मिमी, रुंदी 1490 मिमी आणि उंची 1520 मिमी ठेवली आहे. या डायमेंशनसह 2380 मिमी चा व्हील बेस देण्यात आला असून 160 मिमी ग्राउंड क्लियरन्सही असेल.