मारुती सुझुकी यंदा काही कार्सची नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करणार आहे. याद्वारे नवीन फिचर्स आणि चांगले लुक आणि डिझाईन पहायला मिळणार आहेत. मारुती या वर्षी प्रसिद्ध हॅचबॅक स्विफ्टदेखील लाँच करणार आहे. ही स्विफ्ट नव्या प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी नेक्स्ट जनरेशन स्विफ्ट एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. नवीन प्लॅटफॉर्ममध्ये मजबूत स्टीलचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. मारुतीच्या गाड्या या ग्लोबल एनकॅपमध्ये सुरक्षा देण्यात फेल आहेत. मारुतीला जीएनकॅपचे अध्यक्ष भारतात येऊन काही वर्षांपूर्वी आव्हान देऊन गेले होते. तरी देखील मारुतीच्या कारमध्ये सुधारणा झालेली नाही. ती यावेळी पाहण्यास मिळणार का, असा प्रश्न अनेकांसमोर आहे.
2023 मारुती सुझुकी स्विफ्टच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, त्यात 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.2-लिटर पेट्रोल इंजिन एक सौम्य हायब्रिड सिस्टम असे पर्याय असतील. कंपनी आगामी स्विफ्टला अधिक इंधन कार्यक्षम बनवण्यावर भर देणार आहे.
स्विफ्टमध्ये बरेच कॉस्मेटिक बदल होण्याची शक्यता आहे. लूक आणि डिझाइनसह एक स्पोर्टी हॅचबॅक असेल. कनेक्टेड कार तंत्रज्ञान देखील यात असेल. एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात येईल. या वर्षी स्विफ्ट स्पोर्ट देखील भारतीय बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. ती सध्या युरोपियन देशांमध्ये विकली जातेय.