मुंबई : जग्वार लँड रोव्हर इंडियाने आज भारतामध्ये नवीन रेंज रोव्हर इवोकच्या डिलिव्हरीजना सुरूवात केल्याची घोषणा केली आहे. नवीन इवोक इंजेनिअम २.० लिटर पेट्रोलवर आर-डायनॅमिक एसई ट्रिममध्ये, तसेच २.० लिटर डिझेल पॉवरट्रेनवर एस ट्रिमममध्ये उपलब्ध आहे. २.० लिटर पेट्रोल इंजिन १८४ केडब्ल्यू शक्ती व ३६५ एनएम टॉर्क देते आणि २.० लिटर डिझेल इंजिन १५० केडब्ल्यू शक्ती व ४३० एनएम टॉर्क देते. नवीन रेंज रोव्हर इवोकची किंमत भारतामध्ये एक्स-शोरूम ६४.१२ लाख रूपयांपासून सुरू होते.
जग्वार लँड रोव्हर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले, ''रेंज रोव्हर इवोकने अद्वितीय, आधुनिक व स्मार्ट डिझाइनसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवीन इंटीरिअर रंगसंगती व आधुनिक लँड रोव्हर तंत्रज्ञानांच्या सादरीकरणासह नवीन इवोकची शैली अधिक सुधारण्यात आली आहे आणि नवीन इंजेनिअम पॉवरट्रेन्सना वेईकलला अधिक शक्तिशाली व कार्यक्षम बनवतात.''
नवीन रेंज रोव्हर इवोकमध्ये आकर्षक नवीन वैशिष्ट्ये आहेत- जसे ३डी सराऊंड कॅमेरा, केबिन एअर आयोनायझेशनसह पीएम२.५ फिल्टर, वायरलेस डिवाईस चार्जिंगसह फोन सिग्नल बूस्टर आणि नवीन पीव्ही प्रो इन्फोटेन्मेंट सिस्टिम. नवीन रेंज रोव्हर इवोकबाबत अधिक माहितीसाठी कृपया www.landrover.in या वेबसाइटला भेट द्या.
भारतात लँड रोव्हर प्रोडक्ट पोर्टफोलिओ लँड रोव्हरच्या भारतातील रेंजमध्ये न्यू रेंज रोव्हर इवोक (New Range Rover Evoque) (किंमत ६४.१२ लाख रूपयांपासून), डिस्कव्हरी स्पोर्ट (Discovery Sport) (किंमत ६५.३० लाख रूपयांपासून), रेंज रोव्हर वेलार (Range Rover Velar) (किंमत ७९.८७ लाख रूपयांपासून), डिफेण्डर ११० (Defender 110) (किंमत ८३.३८ लाख रूपयांपासूनस), रेंज रोव्हर स्पोर्ट (Range Rover Sport) (किंमत ९१.२७ लाख रूपयांपासून) आणि रेंज रोव्हर (Range Rover) (किंमत २१०.८२ लाख रूपयांपासून) या कार्सचा समावेश आहे. उल्लेख करण्यात आलेल्या सर्व किंमती या भारतातील एक्स-शोरूम किंमती आहेत.