शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

आता हेल्मेट घातलेलं असतानाही कापलं जाणार 2000 रुपयांचं चलान! जाणून घ्या नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:57 PM

...तर कापलं जाईल 20 हजार रुपयांपेक्षाही अधिकचं चलान!

नव्या ट्रॅफिक नियमानुसार, आता आपण हेल्मेट घातले असतानाही 2000 रुपयांचे चलान कापले जाऊ शखते. कारण मोटार वाहन कायद्यानुसार, आपण मोटारसायकल अथवा स्कूटर चालवताना हेल्मेटची स्ट्रिप लावली नसेल, तर नियम 194D MVA नुसार आपले 1000 रुपयांचे चलान कापले जाऊ शखते. याच बरोबर, आपण सदोष हेल्मेट (BIS नसलेले) घातले असेल तर 194D MVA याच नियमानुसार आपले 1000 रुपयांचे चलानही कापले जाऊ शकते. अशा पद्धतीने हेल्मेट घातले असतानाही, आपण नियमांचे पालन केले नाही तर, आपल्याला 2000 रुपयांचा दंड होऊ शकतो.

...तर कापलं जाईल 20 हजार रुपयांपेक्षाही अधिकचं चलान - नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, आपले वाहन ओव्हरलोडेड असेल तर, आपल्याला 20000 रुपये एवढा जबरदस्त दंडही होऊ शकतो. याशिवाय असे केल्यास आपल्याला प्रति टन 2000 रुपयांचा अतिरिक्त दंडही द्यावा लागू शकतो. महत्वाचे म्हणजे असे या पूर्वीही अनेक वेळा झाले आहे. 

चलान कापले गेले आहे की नाही, असं करा चेक -https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलान स्टेटस हा पर्याय निवडा. यानंतर आपल्याला चलान क्रमांक, वाहन नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) असे पर्याय दिसतील. यांपैकी वाहन नंबर हा पर्याय निवडा. विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि 'Get Detail' वर क्लिक करा. यानंतर चलानचे स्टेटस आपल्या सोमोर येईल.

ट्रॅफिक चलान ऑनलाईन भरण्याची पद्धत -https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. यानंतर, चलानशी संबंधित आवश्यक माहिती भरा आणि कॅप्चा टाका. त्यानंतर गेट डिटेल्सवर क्लिक करा. यानंतर एक नवीन पान ओपन होईल. यावर चालानसंदर्भात माहिती असेल. यानंतर, आपल्याला जे चलान भरायचे आहे ते चलान शोधा. चालानासोबतच आपल्याला ऑनलाइन पेमेंटचा पर्यायही दिसेल. त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. यानंतर, पेमेंट कन्फर्म करा. यानंतर आपले ऑनलाईन चलान भरले जाईल.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडीbikeबाईक