भारतात दुचाकी अपघातांची संख्या मोठी आहे. यामध्ये मृत्यूमुखी पडण्य़ाची संख्याही अधिकच. यामुळे सरकारने वेळोवेळी हेल्मेटसक्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकांना न पटल्याने किंवा अन्य काही कारणांमुळे हेल्मेट वापरण्य़ाकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच कमी किंमतीतील रस्त्यावर मिळणारी बनावट हेल्मेट वापरण्यात येतात. यामुळे सरकारने आता उच्च क्वालिटीच्या हेल्मेट नियमावलीच बदलण्याची तयारी केली आहे. या नव्या हेल्मेटचे वजन 1.5 किलोवरून 1.2 किलोपेक्षा कमी असणार आहे.
या हेल्मेटच्या गुणवत्तेसाठी त्यामध्ये उच्च प्रतीचे साहित्य वापरले जाते. यामुळे त्यांचे वजन वाढते. वजन वाढल्याने मानदुखी सारखे विकारही उद्भवतात. सरकारच्या या निर्णयामुळे बाहेरच्या देशातून भारतात हेल्मेट आयात करणाऱ्या कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही हॅल्मेट जगभरातील देशांचे नियम पाळून बनविलेली असतात. अमेरिका, युरोपमधील नियम हे भारतापेक्षा कडक आहेत. मात्र, या हेल्मेटचे वजन हे 1.2 किलो पेक्षा जास्तच असते. यामुळे ही हॅल्मेट आयएसआय स्टँडर्डमधून बाहेर पडणार आहेत. याचा तोटा कंपन्यांच्या विक्रीवर होणार आहे.
तसेच या कंपन्यांना आणखी एक समस्या भेडसावत आहे. गेल्यावर्षी रस्ते वाहतूक मंत्रालयाने काढलेल्या आदेशामध्ये आयएसआय मार्क नसलेली हॅल्मेट विकणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे म्हटले आहे. यामुळे परदेशी हॅल्मेट्सना अडचण निर्माण झालेली आहे. वजनाच्या अटीबाहेर जात असल्याने ही हॅल्मेट आयएसआय मार्कसाठी योग्य नाहीत. यामुळे जरीही ही हॅल्मेट उच्च प्रतीची असली तरीही ती भारतात वापरण्यासाठी बेकायदेशीर ठरणार आहेत.
जर सरकारने अशा प्रकारच्या हॅल्मेटसाठी वेगळी तरतूद केली तर ते या कंपन्यांच्या फायद्याचे ठरणार आहे. ही नवीन नियमावली आली की उच्च प्रतीच्या हेल्मेट बीआयएस प्रमाणपत्राला पात्र ठरविली जातील.