टाटा मोटर्सने आपली बहुप्रतिक्षित कार Tata Nexon फेसलिफ्ट भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. तिची सुरुवातीची किंमत 8.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही SUV एकूण 11 व्हेरिअंट आणि 6 रंगांमध्ये लॉन्च करण्यात आली असून इच्छुक 21,000 रुपयांमध्ये हिची बुकिंग करू शकता.
असं आहे डिझाईन - या एसयूव्हीच्या डिझाईनसंदर्भात बोलाये झाल्यास, ही कार नव्या लूकमध्ये सादर करण्यात आली आहे. आता हिला एक रिफ्रेश ग्रील, बम्पर, स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, एअर डॅम आणि एल-शेप एलईडी डीआरएल, हिच्या छतावर रूफ रेलसह दोन्ही बाजूंनी ब्लॅक्ड आऊट B पिलर देण्यात आले आहे. हिच्या मागच्या बाजूसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारला नव्याने डिझाइन करण्यात आलेले बम्पर, वाय शेप्ड एलईडी टेललाइट देण्यात आले आहेत. तसेच, रिव्हर्स लाइट व्हर्टीकल शेपमध्ये आहेत. यासह या कारलामध्ये लाइट बारही आहे.
केबिन फीचर्स देखील जबरदस्त -या एसयूव्हीच्या केबिन फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, यात 10.25 इंचांचे टच स्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम, इलेक्ट्रिक सनरूफ, नवे एपी पॅनल, अॅप्पल कार प्लेसह अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय या एसयूव्हीमध्ये टू-स्पोक स्टिअरिंग व्हील, नवे गियर लीव्हर, वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्ससाठी रोटरी डायलसह सेल्फ डिमिंग IRVM देखील देण्यात आला आहे.
असे असेल टाटा नेक्सन फेसलिफ्टचे इंजिन - टाटाच्या या नव्या फेसलिफ्टमध्ये 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 118bhp एवढी पॉवर आणि 170Nm चा टार्क जनरेट करते. तसेच हिच्या गिअरबॉक्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, ही 5 स्पीड मॅन्यूअल, स्पीड मॅन्यूअल, AMT आणि 7 स्पीड DCT ऑप्शनसह सादर करण्यात आली आहे.
याशिवाय, या कारला 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 113bhp एवढी पॉवर आणि 260Nm चा पीक टॉर्क देण्यास सक्षण आहे. ही कार स्पीड मॅन्यूअल युनिट आणि AMT ऑप्शनसह खरेदी केली जाऊ शकते. यांच्यासोबत असणार सामना -नवी टाटा नेक्सॉन फेसलिफ्टचा सामना आधीपासूनच बाजारात असलेल्या ह्युंदाई व्हेन्यू, किआ सोनेट, महिंद्रा एक्सयूव्ही 300 आणि मारुती सुझुकी ब्रेझा सोबत असेल.