टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या प्रिमियम हॅचबॅक कार Toyota Glanza चे अपग्रेडेड व्हर्जन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले आहे. अलीकडेच मारुती सुझुकीनेही या गाडीचे सिस्टर मॉडल बलेनोच्या फेसलिफ्ट (Maruti Baleno facelift) व्हर्जन लॉन्च केले होते.
दरम्यान, कंपनीने Toyota Glanza चार ट्रिम्समध्ये लॉन्च केली आहे. यामध्ये E- व्हेरिएंटची प्रास्ताविक किंमत 6.39 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. याशिवाय, S व्हेरिएंटची किंमत 7.29 लाख रुपयांपासून सुरू होते, G व्हेरिएंटची किंमत 8.24 लाख रुपयांपासून आणि V व्हेरिएंटची किंमत 9.19 लाख रुपयांपासून सुरू होते. हे बलेनोच्या सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा ट्रिम्ससारखे आहे.
11,000 रुपयांमध्ये बुकिंग टोयोटाने Toyota Glanza चे बुकिंग सुरु केले आहे. या गाडीची बुकिंग 11,000 रुपयांमध्ये करता येणार आहे. यामध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 90hp पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क देते. याशिवाय या कारमध्ये बलेनो प्रमाणेच हेड-अप डिस्प्ले, 360-डिग्री कॅमेरा, 9-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. तसेच, या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सोबत टोयोटा आय-कनेक्ट सारखे कनेक्टेड कार फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ही कार 6 एअरबॅगसह येते.
Toyota Glanza चा लूक Toyota Glanza ला बलेनोपेक्षा वेगळा लूक देण्यासाठी कंपनीने यावेळी खूप मेहनत घेतली आहे. यामध्ये नवीन कॅमरी ग्रिल देण्यात आली आहे, तर त्याच्या बंपरला थोडा स्पोर्टी लुूक देण्यात आला आहे. बाजारात ही कार Maruti Baleno, Hyundai i20, Tata Altorz, Honda Jazz आणि Volkswagen Polo सोबत टक्कर देणार आहे.