शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

लाँचिंग आधीच 'या' आलिशान इलेक्ट्रिक कारचे फोटो लीक; सिंगल चार्जवर 270 किमी धावणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 4:47 PM

Mini Cooper SE : कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये 1 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह या इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू केली होती.

नवी दिल्ली :  बीएमडब्ल्यू इंडिया (BMW India) लवकरच भारतात मिनी कूपरचा ( Mini Cooper) चा इलेक्ट्रिक अवतार लाँच करणार आहे, असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. आता ही कार कोणत्याही स्टिकर्सशिवाय दिसली आहे.  बीएमडब्ल्यू ग्रुपची ही इलेक्ट्रिक कार भारतात मिनी कूपर एसई (Mini Cooper SE) नावाने विकली जाईल आणि कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये 1 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह या इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू केली होती.

मिनीने पहिल्या लॉटमध्ये इलेक्ट्रिक एसईचे फक्त 30 युनिट्स ठेवले आहेत. दरम्यान, या सर्व युनिट्स लाँच होण्यापूर्वीच विकल्या गेल्या आहेत.  बीएमडब्ल्यू इंडियाने आता ही कार भारतात लाँच केल्याची पुष्टी केली आहे आणि ही नवीन आणि सुंदर इलेक्ट्रिक कार मार्च 2022 मध्ये भारतात येईल. डिझाईनच्या बाबतीत मिनी नेहमीच एक शानदार कार राहिली आहे आणि तिचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट तीन-दरवाजा मॉडेलमध्ये सादर केले जाणार आहे. मिनी कूपर एसईला आडी ग्रिल, कंट्रास्ट कलरचा ORVM आणि ग्रिलवर वेगळा भाग देण्यात आला आहे.

याशिवाय, इलेक्ट्रिक कारला एलईडी डीआरएलसह सिग्नेचर गोल-आकाराचे हेडलॅम्प, नवीन 1-इंच स्क्वेअर डिझाइन अलॉय व्हील आणि एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहेत. 2022 मिनी कूपर एसईच्या केबिनला 8.8-इंचाची टचस्क्रीन सिस्टीम, नप्पा लेदर अपहोल्स्ट्री आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. नवीन मिनी इलेक्ट्रिक कूपरसोबत कंपनी अनेक फीचर्स देणार आहे. जे हाय-टेक असणार आहेत. 

नवीन कार मिनी कूपर एसईसोबत 32.6 किलोवाट-आर बॅटरी पॅक दिला आहे. जो 181 बीएचपी पॉवर आणि 270 एनएम पीक टॉर्क बनवते. ही कार अतिशय वेगवान आहे आणि केवळ 7.3 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग घेऊ शकते, तर पूर्ण चार्ज केल्यावर 270 किमी पर्यंत धावेल, असा दावा केला जात आहे. ही इलेक्ट्रिक कार 11 किलोवाट आणि 50 किलोवाट चार्जरने चार्ज केली जाऊ शकते आणि हे दोन्ही चार्जर कारची बॅटरी 2.5 तास आणि 35 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज करू शकतात.

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनAutomobileवाहन