नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबद्दलची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: दुचाकी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे कल दिसत आहे. अशा परिस्थितीत, कंपन्यांनाही या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि मोठ्या वाहन निर्मात्यांसोबत जवळजवळ प्रत्येक महिन्याला अनेक स्टार्टअप्स आपल्या नवीन इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करत आहेत. यापैकी एक NIJ ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. कंपनीने एक्सेलेरो प्लस (Asselero Plus) इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ही ड्युअल एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि बूमरॅंग स्टाइल एलईडी इंडिकेटरसह खूपच आकर्षक दिसते.
3 एलएफपी बॅटरी पॅक कंपनीने ही स्कूटर इंपीरियल रेड, ब्लॅक ब्युटी, पर्ल व्हाइट आणि ग्रे टचमध्ये लॉन्च केली आहे. एक्सेलेरो प्लससोबत क्रूझ कंट्रोल सारखे फिचर देण्यात आले आहे, जे लांब पल्ल्याचा प्रवास करताना खूप उपयुक्त आहे. स्कूटर चार बॅटरी कॉन्फिगरेशनमध्ये येते, ज्यामध्ये लीड-ऍसिड बॅटरी आणि 3 एलएफपी बॅटरी पॅक समाविष्ट आहेत. एलएफपी बॅटरी ऑप्शनमध्ये 1.5 kW (48 V), 1.5 kW (60 V) आणि 3 kW सह 48 V ड्युअल बॅटरी सेटअपसह येतात.
इको मोडवर सर्वाधिक 190 किमीची रेंजएक्सेलेरो प्लसला तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत, ज्यामध्ये स्कूटरला इको मोडवर सर्वाधिक 190 किमीची रेंज मिळते. सिटी मोडमध्ये, ती एका चार्जवर 140 किमी पर्यंत चालते. निवडलेल्या लीड-अॅसिड बॅटरी पॅकवर अवलंबून एक्सेलेरो आणि एक्सेलेरो प्लसची एक्स-शोरूम किंमत 53,000 रुपयांपासून ते 98,000 रुपयांपर्यंत आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस आपली पाचवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे, ज्याचे नाव R14 असेल. ही स्कूटर तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत असेल आणि तिची रेंजही सर्वाधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.