निस्सान या जपानच्या वाहन निर्माता कंपनीने भारतात काही वर्षांपूर्वी पाऊल ठेवले आहे. यानंतर डॅटसन हा ब्रँडही आणला आहे. निस्सानची किक्स ही सबकॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतीय रस्त्यांवर धावत आहे. एकंदरीत क्वालिटी आणि दणकटपणा हवा असेल तर ही कार सरस आहे. लोकमतच्या टीमकडे ही कार रिव्ह्यूसाठी आली होती.
कोणत्याही कारचे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते? उत्तम मायलेज की आरामदायीपणा की सुरक्षा? काहींच्या मते उत्तम मायलेज हे कारचे महत्वाचे वैशिष्ट्य असते. उत्तम मायलेज पैसे वाचविणारे असले तरीही एवढे पैसे घालून जर आतील जीव धोक्यात असेल तर काय उपयोगाचे. या विचाराच्या काही कंपन्या भारतीय बाजारात सध्या संघर्ष करत आहेत. यापैकीच ही एक. आम्ही किक्स जवळपास 280 किमी ही कार खड्डेमय रस्ते, उंचसखल भागातून चालविली.
निस्सानने चालकासाठीच ही कार बनविलेली नाही हे यावेळी दिसून आले. तर प्रवाशांनाही प्रवास सुखकर व्हावा असा सीट कंफर्ट देण्यात आला आहे. बिल्ड क्वालिटी उत्तम आहे. खड्ड्यांमधून जाताना धक्के जाणवत नाहीत. वळणावरही कार योग्य संतुलन राखते. ड्रायव्हर व्हिजिबिलीटीही चांगली आहे. बॉडीरोल जाणवत नाही. खड्ड्यांचे धक्के स्टिअरिंगला जाणवत नाहीत. टायर मोठे असल्याने आणि सस्पेंशनही चांगले असल्याने खड्ड्यांची किक आतमध्ये जाणवली नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे रात्रीच्यावेळी प्रवासासाठी एलईडी लाईटसोबत हॅलोजन लाईटही देण्यात आली आहे. जी कमी आम्हाला रेनॉल्ट कॅप्चरमध्ये जाणवली होती. कॅप्चरमध्ये एलईडी लाईट असल्याने धूर, धुके, पावसाच्या वेळी समोरील दृष्यमानता कमीच झाली होती. मात्र, किक्समध्ये हॅलोजनचा पिवळा फोकस असल्याने रस्ता स्पष्ट दिसतो. दुसरी बाब म्हणजे पार्किंग साठी 360 अंशाचा कॅमेरा देण्यात आला होता. किक्स लाँच होऊन साधारण वर्ष झाले आहे. या काळात अन्य कंपन्या साधे सेन्सरही देत नव्हत्या. या कॅमेरामुळे पार्किंग करतेवेळी कोणतीही समस्या जाणवत नाही.
अंतर्गत रचनाडॅशबोर्ड, सीटची क्वालिटी दर्जेदार आहे. स्टार्ट-स्टॉप बटन, युएसबी चार्जिंग, रिअर एसी व्हेंट, 8.0 A-IVI touchscreen, अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, कमी टर्निंग रेडिअस, ड्युअल एअरबॅग, डिझेलसाठी इको मोड अशी फिचर्स देण्यात आली आहेत. लगेज स्पेसही भरपूर म्हणजेच 400 लीटर आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्समायलेजचा विचार करणार असाल तर ही कार यासाठी नाही. आम्हाला 13.9 किमी प्रती लीटरचे मायलेज दिले. 50 लीटरची टाकी ही डिझेल इंजिनची 1.5 लीटर मॅन्युअल ट्रान्समिशन ड्युअल टोन रंगातील एसयुव्ही होती. हिल स्टार्ट असिस्टमुळे चढावाला कारने पुढे जाण्यासाठी त्रास दिला नाही. पिकअप आणि वेगाच्या बाबतीत कार सरस ठरली. म्युझिक सिस्टिमही चांगली होती.
कमतरता काय?कारचे मायलेज कमी आहे. याच रेंजमधील इंजिन असलेल्या कार 20 ते 22 चे मायलेज देतात. याकडे कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे. इको मोडवर आम्हाला 13 ते 14 चे मायलेज मिळाले. इन्फोटेन्मेंट सिस्टीम जरी चांगली असली तरीही फोनवर मॅप कनेक्ट केल्यास कनेक्टीव्हीटी वारंवार तुटत होती. यामुळे रस्त्याकडेला थांबून पुन्हा फोन सिस्टिमला कनेक्ट करावा लागत होता. हे खूपच त्रासदायक होते. नवख्या प्रदेशात अशी समस्या वारंवार उद्भवल्यास हा प्रवास अडचणींचा ठरतो. स्टिअरिंगचा रॉड वळताना अनेकदा ब्रेकवर पाय ठेवल्यावर पायाला लागतो. यामुळे काहीसे अनकंफर्टेबल वाटते. ड्रायव्हरचा आर्मरेस्ट हा स्टोरेज स्पेस असलेला नाही.