शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
3
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
4
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
5
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
6
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
7
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
8
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
9
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
11
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
12
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
14
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
15
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
16
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
17
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
18
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
19
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
20
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना

भारतात बनलेली मॅग्नाईट आता जगात विकली जाणार; निस्सानने मोदींचे मेक इन इंडियाचे स्वप्न साकार केले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 12:18 IST

निस्सान मोटर इंडियाकडून भारतात नवीन मॅग्नाईट लाँच करण्यात आली आहे.

एकीकडे संसदेत विरोधी पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया कसे फेल गेले याचे दाखले देत असताना भारतात बनलेली परदेशी कंपनीची कार जगभरात विकली जाणार आहे. निस्सान मोटर इंडियाकडून भारतात नवीन मॅग्नाईट लाँच करण्यात आली आहे. आता हीच कार लेफ्ट हँड ड्राईव्हमध्ये रुपांतरीत करून ६५ हून अधिक देशांमध्ये विकली जाणार आहे. 

दरडींचा धोकादायक अणुस्कुरा घाट अन् Nissan Magnite AMT; 1200 किमींची कोकणात भ्रमंती, कशी वाटली...

जानेवारी महिन्यात निस्सानने २९०० गाड्या निर्यात केल्या आहेत. या कार लॅटिन अमेरिकेसह इतर देशांमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात ७१०० युनिट राईट हँड ड्राईव्ह आणि लेफ्ट हँड ड्राईव्ह असलेल्या ६५ देशांत पाठविल्या जाणार आहेत. 

निस्सानची ही बी-एसयूव्ही आहे. ही कार चेन्नईतील प्रकल्पामध्ये उत्पादित केली जाते. या कारमध्ये ८ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, यात अॅपल कारप्ले देण्यात आलेला आहे. तसेच या कारमध्ये सहा एअरबॅग्स, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम  (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (ईबीडी), व्हेइकल डायनॅमिक कंट्रोल (व्हीडीसी) आदी सुरक्षेची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. मॅग्नाईटमध्ये टर्बोचार्ज्ड १.० लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. 

लकम अॅनिमेशनसह ७ इंची टीएफटी मीटर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, फुल फ्लश टचस्क्रीनसह ८ इंची इन्फोटेनमेंट डिस्प्ले, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो व बिल्ट इन व्हॉइस रेकग्निशन आदी देण्यात आले आहे. ही कार 20 किमी प्रति लिटरचे मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे. वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, पड्ल लँप्स, बियंट/मूड लायटिंग, जेबीएलचे प्रीमिअम स्पीकर्स देण्यात आले आहेत. ६०-४० स्प्लिट फोल्टेबर रिअर सीटही देण्यात आली आहे. 

टॅग्स :Nissanनिस्सान