केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीNitin Gadkari यांनी गुरूवारी संसदेत मोठी घोषणा केली. सरकार पुढील वर्षभरात टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं त्यांनी संसदेत सांगितलं. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीनं टोल तेवढाच द्यावा लागेल जेवढं त्यांचं वाहन रस्त्यांवर चालेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. Remove all toll plaza in one year Modi Government road National Highway GPS tracking : Nitin Gadkari in Lok Sabha : वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यावर काम सुरू असल्याची गडकरींची संसदेत घोषणाअमरोहा येथील बसपचे खासदार कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वर नजीक रस्त्यावर नगरपालिकेच्या सीमेत टोलनाके असल्याचा मुद्दा संसदेत उचलला होता. यावर उत्तर देताना गडकरी यांनी FASTag लागू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. "यापूर्वीच्या सरकारमध्ये रस्ते योजनांच्या कंत्राटात थोडी आणखी मलाई घालण्यासाठी असे काही टोलनाके उभारण्यात आले जे नगरपालिकांच्या सीमेत आहेत. परंतु हे नक्कीच चुकीचं आणि अन्यायकारक आहे," असं गडकरी म्हणाले. "आता हे सर्व टोलनाके काढले गेले तर नक्कीच रस्ता तयार करणारी कंपनी याची भरपाई मागेल, परंतु सरकारनं येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे," असंही त्यांनी सांगितलं. टोलनाके हटवण्याचा अर्थ हा टोल वसूली बंद करण्यावर नाही तर केवळ टोलनाके हटवणं असा आहे. सरकार सध्या अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्याच्या माध्यमातून वाहन जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर येईल तेव्हा जीपीएसच्या मदतीनं कॅमेरा तुमच्या वाहनाचा फोटो घेईल. तसंच जेव्हा तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून बाहेर पडाल तेव्हा तुमच्या वाहनाचा फोटो घेतला जाईल. यानुसार वाहन चालकांना तेवढ्याच अंतराचा टोल द्यावा लागणार असल्याचं गडकरींनी सांगितलं.
Nitin Gadkari : गडकरींची संसदेत मोठी घोषणा; वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार, महामार्गावर GPS ट्रॅकर लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:31 PM
Remove all toll plaza in one year Modi Government road national highway GPS tracking :Nitin Gadkari in Lok Sabha : वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यावर काम सुरू असल्याची गडकरींची संसदेत घोषणा
ठळक मुद्देवर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यावर काम सुरू असल्याची गडकरींची संसदेत घोषणाकेंद्र सरकारनं सर्व वाहनांसाठी FASTag केलंय अनिवार्य