नवी दिल्ली : तुम्ही दररोज एखादे वाहन वापरत असाल जे तुमच्या सर्व गरजांसाठी उपयुक्त असेल. वाहन चालवताना तुम्हाला जितकी जास्त सोय मिळेल, तितके हे काम तुमच्यासाठी आणि तुमच्या आजूबाजूच्या बाकीच्या लोकांसाठी जास्त जोखमीचे आहे.
या कारणास्तव, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी लोकांना खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.
2020 मध्ये एकूण 3,66,138 अपघात झाले2020 मध्ये मद्यपान करून गाडी चालवल्यामुळे 8,355 अपघात झाले आहेत, तर 20,228 लोकांचे चुकीच्या दिशेने म्हणजेच राँग साइडने वाहन चालवल्याने अपघात झाले आहेत. राज्यसभेत एका लेखी उत्तरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, 2020 मध्ये एकूण 3,66,138 अपघात झाले आहेत.
रेड लाईट तोडल्यामुळे 2,721 अपघात झाले आहेत, तर फोनवर बोलणाऱ्या एकूण 6,753 लोकांचे अपघात झाले आहेत. याशिवाय इतर कारणांमुळे एकूण 62,738 अपघात झाले आहेत. 2020 आणि 2021 मध्ये अनुक्रमे 48,144 आणि 56,204 लोकांना ड्रंक आणि ड्राईव्हसाठी दंड ठोठावण्यात आला आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातून चालानद्वारे 447 कोटी रुपयेकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले की, नवीन कायदा आणि नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे 2021 मध्ये उत्तर प्रदेशातून 447 कोटी रुपये, हरियाणामधून 326 कोटी रुपये आणि राजस्थानमधून 265 कोटी रुपये, याशिवाय बिहारमधून 258 कोटी रुपये चलनाद्वारे जमा झाले.
याचबरोबर, टोलवसुलीबाबत माहिती देताना नितीन गडकरी यांनी म्हणाले की, 2020 आणि 2021 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल प्लाझाची एकूण वसुली अनुक्रमे 27,744 कोटी रुपये आणि 24,989 कोटी रुपये झाली आहे. दरम्यान, अपघातांची ही संख्या खूपच चिंताजनक आहे आणि तुम्हीही वाहन जपून चालवावे, अशी सूचनाही नितीन गडकरी यांनी केली.