नवी दिल्ली: अमेरिकेतील आघाडीची कार निर्माता कंपनी असलेली Tesla भारतात प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाष्य केले आहे. टेस्ला कंपनीला भारतात व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी असून, शक्य तितक्या लवकर प्रकल्प सुरू करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. (nitin gadkari says tesla will immensely benefit from local manufacturing in india)
रियासा संम्मेलनात बोलताना गडकरी यांनी टेस्लाचा भारतातील प्रवेश आणि प्रत्यक्ष प्रकल्प सुरुवात याबाबत मत मांडले. टेस्लाच्या व्यवस्थापकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून संवाद साधला. आगामी वर्षभरात टेस्लाला भारतात व्यवसायाची सुरुवात करण्याची सुवर्ण संधी आहे. टेस्लाने भारतात येण्यास उशीर केल्यास त्यांना नुकसान सोसावे लागू शकते. कारण टेस्लाच्या तोडीची वाहने अन्य कंपन्या बाजारात सादर करू शकतात, असेही गडकरी यांनी नमूद केले.
फक्त पाच वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोपसारखे होतील; नितीन गडकरींनी दिले वचन
गडकरींनी दाखवला 'खुश्कीचा' मार्ग
भारतात इलेक्ट्रॉनिक वाहनांवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. त्यामुळे टेस्लाला ही चांगली संधी आहे. टेस्ला भारतीय उद्योजक, उत्पादकांकडून कच्चा माल, उपकरणे, यंत्रे आधीपासून घेत आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूक करणे टेस्लासाठी अधिक व्यवहारिक ठरेल, असे गडकरी यांनी सांगितले. हा प्रकल्प सुरू झाला की, टेस्ला आणि भारतीय उद्योजक या दोघांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा मिळू शकेल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
शोधाशोध! Tesla ला शोरुमसाठी जागा हवीय; पहिली कार या तीन शहरांत मिळणार
शक्य तितक्या लवकर उत्पादन सुरू करावे
टेस्लाने शक्य तितक्या लवकर भारतात इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू करावे, असा सल्ला गडकरींनी यावेळी दिला. टेस्लाला भारतात प्रकल्प सुरू करण्यासाठी मदत करण्यासाठी सरकार तयार आहे. पुढील दोन वर्षांत भारतातील इलेक्ट्रिक कार क्षेत्रातील चित्र बदललेले पाहायला मिळू शकेल, असेही गडकरी म्हणाले. टेस्ला भारतात उत्पादन सुरू करून परदेशात निर्यातही करू शकेल. भारतात अन्य काही कंपन्यांनी इलेक्ट्रिक कारवर भर देण्यास सुरुवात केली असून, टेस्लाला या क्षेत्रात स्पर्धा वाढू शकते. भारतात प्रकल्प सुरू करणे टेस्लाच्या अधिक हिताचे आहे, असे गडकरींनी सांगितले.
दरम्यान, गेल्या ५ वर्षांपासून टेस्ला कंपनी भारतात गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. टेस्ला सध्या संशोधनावर भर देत असून, या वर्षीच्या अखेरपर्यंत आपली Tesla Model 3 सेडान प्रकारातील सर्वांत स्वस्त कार भारतीय बाजारात उतरवेल. या कारची किंमत ५५ लाखांपासून सुरू होत असल्याचे सांगितले जात आहे.