शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल जाहीर: महायुतीची लाडकी बहीण जिंकली; आदिती तटकरेंचा विजय निश्चित
2
Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?
3
Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
4
Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: "महायुतीच्या विजयात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, ऊर बडवण्याशिवाय..."; नेत्यांनी उडवली खिल्ली
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”
7
Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."
8
Vikhroli Vidhan Sabha Election Result 2024 Live : विक्रोळीत पुन्हा एकदा राऊतांचीच हवा, हॅटट्रिक साधणार?; ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर
9
"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंचा लागतोय कस, एकनाथ शिंदे ठरतायत सरस! असा आहे आतापर्यंतचा कल
11
Nanded Loksabha ByPoll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काय घडतेय? भाजप की काँग्रेस आघाडीवर...
12
Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोल्हापुरात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? जाणून घ्या प्रत्येक अपडेट...
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
14
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
15
Wayanad By Election Result 2024: प्रियांका गांधींची विजयाच्या दिशेने कूच! पहा आकडेवारी
16
Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Election Result 2024 : नवाब मलिक पराभवाच्या छायेत?; राष्ट्रवादी २४ हजार मतांनी पिछाडीवर
17
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
18
Karad North Vidhan Sabha Election Result 2024 Live : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
19
Maharashtra Assembly Election 2024 Result : आशिष शेलारांच्या भावाकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांना टफ फाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर

पीयूसी नाही, वाहन विमा विसरा; भरा हजारोंचा दंड, दुर्लक्ष करणं महागात पडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 10:15 AM

वाहनाचा अपघात झाल्यास व प्रकरण न्यायालयात दाखल झाले तर केवळ पीयूसी नसल्यामुळे वाहन विमा नाकारला जातो.

मुंबई - दुचाकी असो वा चारचाकी; प्रत्येक वाहनापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक असते. पीयूसी नसेल तर नियमभंग मानून कारवाई होऊ शकते. वाहन तपासणी करून पीयूसी प्रमाणपत्र देण्याकरिता मुंबईत  पीयूसी सेंटर कार्यरत आहे. मात्र, अनेक वाहनधारक वेळोवेळी वाहन तपासणी करीत नाहीत व पीयूसी प्रमाणपत्र सोबत बाळगत नाहीत. परिणामी, असे वाहन तपासणी मोहिमेत प्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आल्यास ५० रुपयांसाठी तब्बल २ ते ४ हजार रुपये दंड भरावा लागतो. शिवाय वाहनाचा अपघात झाल्यास व प्रकरण न्यायालयात दाखल झाले तर केवळ पीयूसी नसल्यामुळे वाहन विमा नाकारला जातो.

पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक मोटार वाहन कायद्यानुसार सध्या  वाहनांना पीयूसी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. वाहन तपासणी पीसीमुळे वाहन किती प्रदूषण करते हे लक्षात येते. हे प्रमाणपत्र काढण्यासाठी ५० रुपये खर्च येतो. विनापीयूसी वाहन प्रादेशिक परिवहन विभागाच्या भरारी पथकाच्या तपासणीत दिसल्यास ५० रुपयांच्या पीयूसीसाठी किमान २ ते ४ हजार रुपयाचा दंड आकारला जातो.

पीयूसी नसल्यास विमा नाकारला जाऊ शकतो एखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि संबंधित वाहनमालकाकडे वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर विमा नाकारला जाऊ शकतो.

प्रत्येकी २ हजारांचा दंडदुचाकी, तीनचाकी, चारचाकी पेट्रोल, डिझेल वा सीएनजी प्रकारांतील वाहन पीयूसी नसताना तपासणी मोहिमेत आढळल्यास चालक आणि मालक यांना वेगवेगळा दंड आकारला जातो. पीयूसी नसलेले वाहन चालविताना  स्वतः मालक आढळून आला तर दोन हजार रुपये दंड आणि मालक, चालक वेगळे असतील तर प्रत्येकी २ हजार  याप्रमाणे चार हजार रुपये दंड  वसूल केला जातो.