नोकियाच्या फोनचाही एक काळ होता. बाजारात फोन म्हटलं की नोकिया हेच बोललं जायचं. मात्र, काळानुसार स्मार्टफोनचा जमाना आला आणि या स्मार्ट स्पर्धेत नोकियाचा फोन मागे पडला. मात्र, आता पुन्हा एकदा नोकिया कंपनीने स्मार्टफोनच्या माध्यमातून कमबॅक केलंय. स्मार्टफोनचे नवनवीन मॉडेल बाजारात लाँच करत कंपनीने आता Nokia C12 Plus भारतात लाँच केला आहे.
Nokia C12 Plus हा एंट्री लेव्हल फोन आहे, ज्यामध्ये अँड्रॉईड 12 (Go Edition) आहे. तसेच, नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच HD+ डिस्प्ले आहे. Nokia C12 Plus मध्ये Unisoc चा ऑक्टाकोर प्रोसेसरही आहे. 2 जीबी रॅमसह 32 जीबी मेमरी स्टोरेज या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलीय.
Nokia C12 Plus ची किंमत
Nokia C12 Plus ची किंमत 7,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनला नोकियाच्या वेबसाइटवरुनही खरेदी करता येऊ शकते. दरम्यान, यापूर्वी Nokia C12 हा स्मार्टफोन 5,999 रुपयांच्या किंमतीसह लाँच करण्यात आला होता.
Nokia C12 Plus चा कॅमेरा
Nokia C12 Plus मध्ये 8 मेगा-पिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आहे. ज्यासोबत एलईडी फ्लॅश लाइट आहे. फ्रंट मध्ये 5 मेगा-पिक्सेल कॅमेरा असून त्यासह अनेक फिचर्सही देण्यात आले आहेत.
Nokia C12 Plus ची बॅटरी
Nokia C12 Plus मध्ये कनेक्टिविटीसाठी Wi-Fi 802.11b/g/n, ब्लूटूथ 5.2, माइक्रो यूएसबी पोर्ट, 3.5mm चा हेडफोन जॅक आहे. तसेच, 4000mAh ची बॅटरी आहे. या सीरीजच्या पहल्या फोनमध्ये 3000mAh ची देण्यात आली होती.
Nokia C12 Plus चे स्पेसिफिकेशन
Nokia C12 Plus में एंड्रॉईड 12 चा गो एडिशन आहे. त्यासह, फोनमध्ये 6.3 इंच HD+ डिस्प्ले आहे. डिस्प्ले ची स्टाइल वॉटरड्रॉप नॉच आहे. त्यामध्ये, Unisoc चा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे, ज्याची क्लॉक स्पीड 1.6Hz आहे. फोन मध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे.