नवी दिल्ली : भारतीय बाजारात छोट्या कारचे वर्चस्व सातत्याने कमी होत असून लोकांचा ओढा मोठ्या कारकडे झुकत आहे. २०२१-२२ मध्ये ५ लाख रुपयांपर्यंतच्या कारची विक्री घटून १०.५ टक्के राहिली आहे. या कारची बाजारातील हिस्सेदारी २०१८-१९ मध्ये २६ टक्के होती.
क्रिसिलने जारी केलेल्या एका अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या कारची विक्री तब्बल ३८ टक्क्यांनी वाढली आहे. १० लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या कारची विक्री फक्त ७ टक्क्यांनी वाढली आहे.
५ ते ७.५ लाख रुपये किंमत असलेल्या कारची बाजारातील हिस्सेदारी ३४.९ टकक्यांनी घटून ३२.४ टक्क्यांवर आली आहे. १० ते १२.५ लाख रुपये किंमत असलेल्या कारची बाजारातील हिस्सेदारी वाढून ११.५ टक्के झाली आहे. २०१९ मध्ये ती अवघी ५.५ टक्के होती. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एकदा वाहन विक्रीत वाढ होत आहे.
- १० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या कारची विक्री २०१८-१९ पासून सातत्याने वाढत आहे. - २०२१-२२ मध्ये १० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या कारची हिस्सेदारी वाढून ३० टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. - २०१८-१९ मध्ये ती २४ टक्क्यांपेक्षा कमी होती. १० लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या कारची बाजारातील हिस्सेदारी ७६% वरून घटून ७०%वर आली आहे. १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमत असलेल्या कारची हिस्सेदारी वाढून ३०% झाली आहे.
स्वस्त कारची बाजार हिस्सेदारीकिंमत २०१८-१९ २०२१-२२५ लाखांपर्यंत २५.९% १०.५%५ ते ७.५ लाख ३४.९% ३२.४%७.५ ते १० लाख २३.८% २८.२%१० ते १२.५ लाख ५.५% ११.१%१२.५ ते १५ लाख ४.०% ६.०%१५ ते १७.५ लाख २.८% ४.३%१७.५ ते २० लाख १.३% ३.७%२० लाख+ १.८% ३.८%